मोदी सरकार ‘या’ महिलांच्या खात्यात पाठवत आहे 5 हजार रुपये, जाणून घ्या कुणाला मिळेल लाभ

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकट काळात सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीवर थेट परिणाम होत आहे. अशा स्थितीत गरोदर महिलांच्या कल्याणासाठी जानेवारी 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत लाखो महिलांनी रजिस्ट्रेशन केले आहे आणि याचा फायदा घेत आहेत.

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत गरोदर महिलांच्या खात्यात 5000 हजार रुपये मोदी सरकार पाठवत आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे आज आम्ही सांगणार आहोत…

या योजनेत गरोदर महिला आणि स्तनपान करत असलेल्या महिलांना 5000 रुपये मिळतात. हे तीन वेगवेळ्या हप्त्यात मिळतात. 19 वर्षाच्या अगोदर गरोदर झालेल्या महिलांना याचा लाभ मिळत नाही.

कधी मिळतात पैसे?
या योजनेंतर्गत पहिल्यांदा गरोदर झाल्यानंतर पोषणासाठी पाच हजार रूपये गरोदर महिलेच्या खात्यात दिले जातात. याचा 1000 रूपयांचा पहिला हप्ता गर्भधारणेच्या 150 दिवसांच्या आत गरोदर महिलेची नोंदणी झाल्यानंतर दिला जातो. तर दुसरा हप्ता 2000 रूपये 180 दिवसांच्या आत आणि किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी झाल्यानंतर दिला जातो. 2000 रूपयांचा तिसरा हप्ता प्रसुतीनंतर आणि बाळाचे पहिले लसीकरण चक्र पूर्ण झाल्यानंतर मिळतो.

कोणत्या महिलांना मिळतो लाभ?
या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळतो, ज्या रोजंदारीवर काम करतात किंवा ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. ही आर्थिक मदत मिळाल्याने गरोदर महिलेला आराम करण्यासाठी वेळ मिळतो.

कसा करावा अर्ज?
मातृत्व वंदना योजना 2021 च्या अंतर्गत केंद्र सरकारने अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे, म्हणजे आता ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम www.Pmmvy-cas.nic.in वर लॉगिन करून अर्ज करावा लागेल. घरबसल्या हे काम होऊ शकते.