घरात असलेल्या सोन्यावर मोदी सरकारची ‘नजर’, ‘या’ योजनेत ‘बदल’ करण्याची तयारी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सर्वसामान्यपणे लोक सोने खरेदी करून घरात ठेवणे पसंत करतात. यावर लोकांना काही परतावा मिळत नाही अथवा अर्थव्यवस्थेला फायदा होत नाही. सरकारच्या गोल्ड मोनॅटायझेशन योजनेत घरात पडलेल्या सोन्यावर परतावा दिला जातो. परंतु, असे असतानाही लोक या योजनेत रूची दाखवताना दिसत नाहीत. यासाठी सरकार या गोल्ड मोनॅटायझेशन योजनेमध्ये काही बदल करण्याच्या तयारीत आहे.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी गोल्ड मोनॅटायझेशन योजनेत बदल करण्यासाठी ज्‍वेलरी इंडस्ट्रीकडून सूचना मागविल्या आहेत. गोयल यांनी म्हटले आहे की, मला वाटते की, लोकांच्या तिजोरीत मोठ्याप्रमाणात सोने पडलेले आहे. यातून त्यांना कोणताही परतावा मिळत नाही, अथवा अर्थव्यवस्थेला कोणताही फायदा होत नाही.

गोयल यांनी म्हटले की, मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की, तुम्ही एक अशी योजना तयार करण्यासाठी मदत करा की जिच्यामुळे सर्वांचा फायदा होईल आणि या योजनेचे आकर्षण वाढेल. घरात निष्क्रीय पडलेले सोने बँकेत जमा करून त्यावर लोकांना उत्पन्न मिळवून देणे ही आमची इच्छा आहे.

मोदी सरकारने २०१५ मध्ये गोल्ड मोनॅटायझेशन योजना सुरू केली होती. परंतु, कमी परतावा आणि सुरक्षेची चिंता यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेसाठी काही ठराविक कालावधीसाठी बँकेत सोने ठेवावे लागते. यावर २.२५ ते २.५० टक्के व्याज मिळते. योजनेनुसार कमीतकमी ३० ग्रॅम ९९५ शुद्धता असलेले सोने बँकेत ठेवावे लागते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/