Modi Government | दररोज 1 रूपया पेक्षाही कमी पैशात मिळतोय 2 लाख रुपयांचा विमा, जाणून घ्या काय ‘ही’ मोदी सरकारी योजना

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Modi Government | नेहमी असे दिसून येते की, कमी उत्पन्न गटातील लोक विमा योजना घेण्यात रूची दाखवत नाहीत. ही स्थिती सुधारण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) अनेक विमा योजना आणल्या आहेत, ज्यामध्ये प्रीमियमची रक्कम खुप कमी आहे आणि कोणत्याही उत्पन्न गटातील व्यक्ती त्या सहज खरेदी करू शकतात.

अशा अनेक सरकारी पॉलिसीपैकी एक आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana). या अंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयांचा लाईफ इन्श्युरन्सचा लाभ मिळतो आणि यासाठी तुम्हाला वार्षिक केवळ 330 रुपये म्हणजे 30 रुपये प्रति महिनापेक्षा सुद्धा कमीचा प्रीमियम भरावा लागतो. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेबाबत जाणून घेवूयात…

2 लाख रुपयांचा टर्म इन्श्युरन्स

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana सर्व भारतीयांसाठी आहे. यामध्ये 18 ते 50 वर्षापर्यंतच्या प्रौढांना सहभागी होता येते.
यामध्ये रजिस्टेशनसाठी बँक आणि Life insurance कंपन्यांमध्ये टायअप असते. यामध्ये अवघे 330 रुपये वार्षीक प्रीमियम देऊन एनरोल होता येते.
2 लाख रुपयांचे इन्श्युरन्स कव्हर मिळेल. याचा कालावधी वर्षभर असतो. दरवर्षी रिन्युअल करावे लागते.
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana मध्ये Life cover 55 वर्षाच्या वयापर्यंत मिळते.
कुणीही ग्राहक केवळ एक बँक अकाऊंट आणि एका इन्श्युरन्स कंपनीसोबतच या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतो.

अशाप्रकारे करा अप्लाय

तुम्ही https://jansuraksha.gov.in/ वेबसाइटवर जाऊन या योजनेसाठी फॉर्म डाऊनलोड करू शकता आणि तो भरून संबंधित बँक किंवा विमा संस्थेत जमा करू शकता. एकापेक्षा जास्त सेव्हिंग अकाऊंट असल्यास केवळ एकाच अकाऊंटद्वारे या विमा योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो.

Web Title : Modi Government | know details about pm jivan jyoti bima yojana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘या’ पदासाठी होतेय 111 जणांची भरती, जाणून घ्या

PM Svanidhi Yojana | पैशाची गोष्ट ! आता आणखी सहज मिळेल कर्ज, आरबीआयनं आणलाय विशेष प्रकारचा प्लान; जाणून घ्या कोणाला मिळणार

Pune Crime | फोरेक्स ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून 15 लाखाची फसवणूक