One Nation One Ration Card योजनेचा फायदा आजपासून ‘या’ राज्यातील कोट्यवधी लोकांना मिळणार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आजपासून दोन केंद्रशासित प्रदेश लडाख आणि लक्षद्वीप वन नेशन वन रेशनकार्ड योजनेचा भाग बनले आहेत. या दोन्ही राज्यांना केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना वन नेशन वन रेशनकार्ड योजनेच्या पोर्टेबिलिटी सेवेशी जोडले आहे. केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. पासवान यांनी म्हटले की, आज आणखी दोन केंद्रशासित प्रदेश लडाख आणि लक्षद्वीप पंतप्रधान मोदी यांच्या कुशल नेतृत्वात मोदी 2.0 सरकारच्या महत्वाकांक्षी वन नेशन वन रेशनकार्ड योजनेत सहभागी झाले आहेत. आता एकुण 26 राज्य आणि केंद्र शासित राज्यात रेशन कार्ड पोर्टेबिलिटी उपलब्ध आहे.

या महत्वकांक्षी योजनेत मागील महिन्यात मणिपुर, नागालँड, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आता देशात एकुण 26 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध झाली आहे. देशातील या 26 राज्यांचे बाहेर राहणारे लोक आता आपल्या हिश्श्याचे रेशन घेऊ शकतील.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत 24 राज्यांच्या 65 कोटींपेक्षा जास्त लाभार्थींना वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा लाभ मिळाला आहे. आता 1 सप्टेंबर 2020 पासून या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहणारे दुसर्‍या राज्यातील लोक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेद्वारे तुम्ही कुठेही राहात असलात तरी तुम्हाला तुमच्या हिश्श्याचे धान्य प्राप्त करता येते. ज्यामुळे दुसर्‍या राज्यात काम करणारे लाभान्वित होतील.

देशात 31 मार्च 2021 पर्यंत 81 कोटींपेक्षा जास्त लाभार्थींना या योजनेत जोडण्याचा प्लॅन आहे. या योजनेशी जोडल्यानंतर अध्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांना लाभ मिळेल. केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करत आहेत की, 31 मार्च 2021 पर्यंत देशातील सर्व राज्यांना वन नेशन वन रेशन कार्ड योजनेशी जोडले जावे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणारे सर्व 81 कोटी लाभार्थी या योजनेचा सहज लाभ घेऊ शकतील.

काय आहे रेशन कार्ड पोर्टेबिलिटी

ज्याप्रमाणे मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी आपण करतो, तसेच आता रेशन कार्डसुद्धा पोर्ट करता येईल. मोबाइल पोर्टमध्ये तुमचा नंबर बदलत नाही आणि तुम्ही कंपनी बदलून त्या नंबरचा वापर करू शकता. अशाच प्रकारे, रेशन कार्ड पोर्टेबिलिटीमध्ये तुमचे रेशन कार्ड बदलणार नाही. म्हणजे एका राज्यात गेल्यास आपल्याच रेशनकार्डचा वापर करून तिथे सरकारी रेशन खरेदी करू शकता.