मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ? केंद्रीय मंत्र्याने दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहेरी तलाक, कलम 370, सुधारित नागरिकत्व कायदा ही तीन महत्त्वाची पाऊलं उचलल्यानंतर आता मोदी सरकार लवकरच आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय कायदा मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करताना उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या मुद्यावर लवकरच भाजपकडून काम सुरु केलं जाऊ शकतं, तसे संकेत प्रसाद यांनी दिले आहेत.

मागील सात महिन्यामध्ये मोदी सरकारनं तीन मोठ्या आश्वासनांची पूर्तता केली. त्यावर भाष्य करताना, आम्ही जनतेला कोणताही आश्चर्याचा धक्का दिला नसल्याचं प्रसाद म्हणाले. गेल्या सात महिन्यामध्ये मार्गी लावलेल्या कायद्यांच आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले होते. पुन्हा सत्तेवर येताच आम्ही त्याची पूर्तता केल्याचे प्रसाद यांनी सांगितले. मोदींनी लोकसंख्या वाढीला वेसण घालण्याची गरज लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात व्यक्त केली होती, याची आठवण त्यांनी करुन दिली.

भारतीयांनी लोकसंख्या नियंत्रणाचा विचार करायला हवा, असे आवाहन मोदींनी भाषणातून केले होते. पंतप्रधान नेहमीच लाल किल्ल्यावरून महत्त्वाच्या घोषणा करत असतात. देशाने लोकसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला हवीत. आता देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, असे मोदींनी म्हटल्याचे त्यांनी सांगितले. राजस्थानातील ग्रामपंचायतीमध्ये असा नियम आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. राजस्थानात एकापेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना उमेदवारी मिळत नसल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/