Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा, बेसिक सॅलरी 15000 ने वाढून होऊ शकते 21000

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government | 1 ऑक्टोबरपासून प्रायव्हेट आणि सरकारी सेक्टरच्या कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार मोदी सराकर (Modi Government) 1 जुलैपासून लेबर कोडचे नियम (Labour Code Rules) लागू करणार होते परंतु राज्य सरकारांची तयारी नसल्याने आता 1 ऑक्टोबरपासून लागू करण्याचे टार्गेट ठेवले आहे. जर 1 ऑक्टोबरपासून लेबर कोडचे नियम लागू केले गेले तर कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी 15000 रुपयांवरून वाढून 21000 रुपये होऊ शकते.

जाणून घ्या कोणत्या नियमात होईल बदल

नवीन ड्राफ्ट रूलनुसार, मुळ वेतन एकुण वेतानाच्या 50% किंवा जास्त असायला हवे.
यामुळे बहुतांश कर्मचार्‍यांच्या वेतन स्ट्रक्चरमध्ये बदल होईल.
बेसिक सॅलरी वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युएटीसाठी कापून जाणारे पैसे वाढतील कारण यामध्ये जाणारे पैसे बेसिक सॅलरीच्या पटीत असतात.

ही आहे युनियनची मागणी

लेबर कोडच्या नियमावरून आता लेबर युनियन मागणी करत होत्या की, कर्मचार्‍यांची किमान बेसिक सॅलरी वाढवून 15000 रुपयांवरून 21000 रुपये करण्यात आली पाहिजे.
जर असे झाले तर कर्मचार्‍यांचे वेतन वाढेल. नवीन ड्राफ्ट रूलनुसार, मुळ वेतन एकुण वेतनाच्या 50% किंवा जास्त असायला हेव.
यातून बहुतांश कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होऊ शकतो.

 

रिटायर्मेटचे पैसे वाढतील, टेक होम सॅलरी कमी होणार

बेसिक सॅलरी वाढल्याने PF आणि ग्रॅच्युटीसाठी कापले जाणारे पैसे वाढतील कारण यामध्ये जाणारे पैसे बेसिक सॅलरीच्या पटीत असतात.
जर असे झाले तर टेक होम सॅलरी कमी होईल.
मात्र, रिटायर्मेंटनंतर मिळणारे PF आणि ग्रॅच्युएटीचे पैसे वाढतील.
लेबर युनियन याचा विरोध करत होत्या.

1 ऑक्टोबरपासून बदलतील नियम

1 ऑक्टोबरपासून लेबर कोडचे नियम लागू झाले तर कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी 15000 रुपयांवरून वाढून 21000 रुपये होऊ शकते. परंतु, टेक होम सॅलरी कमी होईल.
तसेच कामाचे तास 8 वरून थेट 12 होऊ शकतात.संसदेने ऑगस्ट 2019 ला तीन लेबर कोड इंडस्ट्रियल रिलेशन, कामाची सुरक्षा, हेल्थ आणि वर्किंग कंडीशन आणि सोशल सिक्युरिटीशी संबंधीत नियमात बदल केले होते. हे नियम सप्टेंबर 2020 ला पास झाले होते.

 

Web Title : modi government may announce private employees basic salary hike from rupees 15000 to 21000 check

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

HDFC बँकेचे ग्राहक आता विना डेबिट कार्ड ATM वर करू शकतात पैशांचे ट्रांजेक्शन, जाणून घ्या कसे?

Tokyo Olympics | मेडल जिंकण्यापूर्वी बोट रिपेयर करण्यासाठी महिला खेळाडूने केला ‘कंडोम’चा वापर, व्हिडिओ पाहून लोक होत आहेत ‘हैराण’

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर