1 एप्रिलपासून नोकरदारांना करावे लागेल 5 तास काम आणि वाढणार PF, जाणून घ्यामोदी सरकारचा ‘प्लॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जर आपणही नोकरी करत असाल तर आपल्यासाठी 1 एप्रिलपासून काही मोठे बदल होऊ शकतात. या बदलांनंतर तुमचा पीएफ, कामाचे तास आणि पगार असे बरेच नियम बदलणार आहेत. याशिवाय तुमची ग्रॅच्युइटी आणि पीएफही वाढेल. त्याच वेळी, आपली टेक होम सॅलरी कमी होईल. दरम्यान, या विधेयकाच्या नियमांवर अद्याप चर्चा सुरु आहे, कि त्याची अंमलबजावणी कशी केली जाऊ शकते. हे बदल गेल्या वर्षी संसदेत मंजूर झालेल्या तीन वेतन संहिता विधेयक (कोड ऑन वेजेस बिल) मुळे होऊ शकतात. यंदा 1 एप्रिलपासून ही बिले लागू होण्याची शक्यता आहे.

कोणत्या प्रकारचे घडू शकतात बदल-

1. वेतनात बदल –  सरकारी योजनेनुसार 1 एप्रिलपासून मूळ पगार (सरकारी नोकऱ्यांमध्ये मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता) एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावा. या बदलामुळे नियोक्ता व कामगार दोघांनाही फायदा होईल, असा सरकारचा दावा आहे.

2. पीएफमध्ये होऊ शकेल वाढ –  नवीन नियमांनुसार एकीकडे पीएफमध्ये वाढ होत असताना तुमची इन हॅन्ड सॅलरी कमी होईल. मूलभूत पगार एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावा. या बदलानंतर, बहुतेक लोकांच्या पगाराची रचना बदलू शकते. दरम्यान, मूलभूत पगार वाढल्याने आपला पीएफ देखील वाढेल कारण तो आपल्या बेसिक सॅलरीवर आधारित आहे.

3. 12 तास काम करण्याचा प्रस्ताव –  या व्यतिरिक्त जास्तीत जास्त कामकाजाचे तास वाढवून 12 पर्यंत करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ओव्हरटाईममध्ये 15 ते 30 मिनिटे अतिरिक्त काम समाविष्ट करण्याची तरतूद आहे. सध्या, जर आपण 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ काम केले तर ते ओव्हरटाइममध्ये मोजले जात नाही.

4. 5 तास काम केल्यावर अर्धा तास ब्रेक –  याव्यतिरिक्त, सतत 5 तासापेक्षा जास्त काम करण्यावर बंदी असेल. कर्मचार्‍यांना 5 तास काम केल्यानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा, असा सरकारचा विश्वास आहे.

5. सेवानिवृत्तीची रक्कम वाढेल –  पीएफची रक्कम वाढल्यामुळे सेवानिवृत्तीची रक्कमही वाढेल. सेवानिवृत्तीनंतर लोकांना या रकमेमधून बरीच मदत मिळेल. पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढल्यास कंपन्यांची किंमतही वाढेल कारण त्यांनाही कर्मचार्‍यांना पीएफमध्ये अधिक वाटा द्यावा लागेल.