Modi Government | मोदी सरकार बदलणार नियम?, आता 12 तासाच काम अन् अर्धा तासाचा ब्रेक, पगार कमी अन् पीएफ मिळणार जास्त

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकार (Modi government) देशातील कामगारांच्या (workers) दृष्टीने महत्वाचे पण तितकेच जाचक निर्णय घेताना दिसत आहे. आता येणा-या काळात कामाच्या ठिकाणी ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी (Gratuity and PF) आणि कामांच्या तासांमध्ये (working hours) मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
यात कामगारांच्या सध्याच्या असलेल्या 9 तासांवरून 12 तास करण्याचा विचार सरकार करत आहे. तसेच कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅच्युइटी (Gratuity) आणि पीएफ (Provident Fund) वाढेल. मात्र तुम्हाला हाती मिळणारा पगार (Take Home Salary) कमी होणार आहे.
यामुळे कंपनीच्या बॅलन्स शीटवर परिणाम होईल. Modi government may change these working rules including work hours to 12 hours overtime pf retirement salary in hand
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 3 कामगार कायदे (Labour Code) मंजूर केली आहेत. त्यानुसार हा बदल केला जाणार आहे.
सरकारला 1 एप्रिलपासून नव्या कामगार संहितेमधील नियमांची अंमलबजावणी करायची होती, पण राज्यांची तयारी न झाल्यामुळे आणि कंपन्यांना एचआर पॉलिसी बदलण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने तूर्तास पुढे ढकलली आहे.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, अस असले तरी मोदी सरकार हे कायदे लवकर लागू करण्याच्या तयारीत आहे.

1) 12 तास करण्याचा प्रस्ताव

नवीन ड्राफ्ट कायद्यानुसार कामकाजाची वेळ 12 तास करण्याचा विचार सरकार करत आहे. कोडच्या ड्राफ्ट नियमानुसार 15 ते 20 मिनिटांच्या अतिरिक्त कामाला 30 मिनिटांच्या ओव्हरटाइममध्ये समाविष्ट करण्याची तरतूद आहे.
सध्या 30 मिनिटांपेक्षा कमी अतिरिक्त वेळेला ओव्हरटाइम मानल जात नाही.
तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला सलग 5 तास काम करता येणार नाही, कर्मचाऱ्यांना दर 5 तासांनी अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा लागेल.

2) पगार कमी अन् पीएफ जास्त
नवीन मसुद्याच्या नियमानुसार मूलभूत वेतन (Basic Salary) एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावे. यामुळे बहुतांश कर्मचार्‍यांच्या पगाराची रचना बदलली जाणार आहे.
यामुळे तुमचा हाती येणारा पगार कमी होऊन पीएफची PF रक्कम वाढण्याची शक्यता आहे.

3) निवृत्तीच्या फंडात होईल वाढ
ग्रॅच्युइटी अन् पीएफ (Gratuity and PF) योगदान वाढल्यामुळे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ होईल. पीएफ PF आणि ग्रॅच्युइटी (Gratuity) वाढल्यामुळे कंपन्यांच्या खर्चात वाढ होईल.
कारण त्यांना कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये अधिक योगदान करावं लागेल.
या सर्व गोष्टींमुळे कंपनीच्या बॅलन्स शीटवर देखील परिणाम होणार आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title :  Modi government may change these working rules including work hours to 12 hours overtime pf retirement salary in hand

हे देखील वाचा

प्रसिद्ध चितळे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत ‘ब्लॅकमेल’; 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तिघांना अटक

Pune News | गावकर्‍यांना अंधारात ढकलून डीपीमधील 700 किलो तांब्याच्या तारा चोरणारे चोरटे अटकेत

नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?’