खुशखबर ! मोदी सरकार गॅस डिस्ट्रीब्शूनमध्ये करणार मोठे बदल, तुम्हाला मिळणार ‘हे’ फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीटी गॅस डिस्ट्रीब्यूशन प्रोजेक्टला नॅशनल इंफ्रास्ट्रक्चर पाइपलाइनमध्ये सामील केले जाणार आहे. यामुळे दोन्ही प्रोजेक्टला मिळणारे अनुदान मिळण्यास अडचण येणार नाही. पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलेल्या माहितीनुसार यामुळे सीटी गॅस डिस्ट्रीब्यूशन प्रोजेक्ट लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वी सरकारने नॅशनल इंफ्रास्ट्रक्चर पाइपलाइन प्रोजेक्ट सुरु केला होता. या माध्यमातून पुढील 5 वर्षांत 100 लाख कोटी रुपयांचे प्रोजेक्ट पूर्ण केले जाणार होते. यासाठी काही दिवसांपूर्वी एक उच्चस्तरीय बैठक देखील पार पडली होती. यामध्ये या प्रोजेक्टमध्ये कोणत्या सेक्टरमधील प्रोजेक्टला समाविष्ट करायचे याची चर्चा करण्यात आली होती.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही प्रोजेक्ट एकत्र केल्याने दोघांना मोठ्या प्रमाणात निधी मिळणार असून यामार्फत तयार होणारे प्रोजेक्ट देखील वेळेत होणार आहेत. तसेच सरकारला देखील यावर लक्ष ठेवणे सोपे जाईल. या प्रोजेक्टमार्फत देशातील 50 शहरांमध्ये जास्तीत जास्त सिएनजी स्टेशन उभारले जाणार असून यामार्फत घरापर्यंत गॅसचे कनेक्शन देता येणार आहे. दरम्यान, 2020 पर्यंत देशातील 1 कोटी घरांमध्ये गॅस देण्याचे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य आहे. त्यामुळे सरकार यावर मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवून असून हि योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

visit : policenama.com 

You might also like