Modi Government | मायावतींची मोठी घोषणा ! ‘या’ मुद्द्यावर मोदी सरकारला देणार पूर्ण समर्थन, बसपा सुप्रीमोची ही आहे रणनिती; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) जनगणनेबाबत चर्चा सुरू असताना आगामी यूपी विधानसभा निवडणुकीसाठी बसपा सुप्रीमो मायावती (Mayawati) यांनी या प्रकरणात मोदी सरकारला (Modi Government) समर्थन देण्याची घोषणा केली आहे. मायावती यांनी शुक्रवारी म्हटले की, देशातील इतर मागासवर्गाची (ओबीसी) वेगळी जनगणना करण्याच्या मागणीवर केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) जर एखादे सकारात्मक पाऊल उचलले तर बसपा (BSP) संसदेच्या आत आणि बाहेरसुद्धा याचे समर्थन करेल. ओबीसी वोटबँकेवर लक्ष ठेवून मायावतींनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

मायावती यांनी ट्विट केले आहे की, देशात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करण्याची मागणी बसपा सुरूवातीपासून करत आली आहे तसेच अजूनही बसपाची ही भूमीका आहे आणि या बाबतीत केंद्र सरकारने जर कोणताही सकारात्मक निर्णय घेतला तर बसपा संसदेच्या आत आणि बाहेर सुद्धा भाजपाचे समर्थन करेल.

मायावतींचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे, जेव्हा बिहारमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघे ओबीसींसाठी जत निहाय जनगणनेची मागणी करत आहेत. काही दिवसापूर्वी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या मागणीत सूर मिसळून नीतीश कुमार यांनी सुद्धा म्हटले होते की, ओबीसींची जनगणना झाली पाहिजे.

गुरुवारी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी म्हटले की,
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे.

Web Title :- Modi Government | mayawati supports separate obc census says bsp will support central government in parliament

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Solapur Crime | कामगार मंत्र्यांचीच हकालपट्टीची मागणी करणारा खंडणीखोर अटकेत

Cold Drink पिल्यानंतर श्वास कोंडल्याने झाला 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, Postmortem मध्ये झाला खुलासा

Adar Poonawala | अदर पुनावाला यांची मोठी घोषणा ! ‘Covovax ऑक्टोबरमध्ये तर लहान मुलांसाठीची लस 2022 मध्ये’