Modi Government | मोदी सरकार देणार कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. सरकार जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता (DA) वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (The salaries of government employees will be increased)

 

या दरम्यान, महागाई भत्त्यामध्ये (DA) 4 टक्के वाढ होणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे. महागाई भत्त्यात ही वाढ झाली तर जुलै महिन्यापासून केंद्र सरकारच्या जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात (Salary) वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सलग दोन महिने एआयसीपीआय इंडेक्स (AICPI Index) कमी झाला तरीही मार्चमध्ये पुन्हा त्यात वाढ झाली. जानेवारीत इंडेक्स कमी होऊन 125.1 वर आला होता. त्यानंतर फेब्रुवारीत 125 अंकावर आला होता. पण मार्च महिन्यात एका झटक्यात इंडेक्स एक अंकाने वाढून 126 वर पोहचला. म्हणून सरकारनं कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची चर्चा आहे. (Modi Government)

सरकारने यावर्षी सुरुवातीला 3 टक्क्यांनी महागाई भत्त्यात (DA) वाढ केली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जातो. जुलैमध्ये महागाई भत्ता वाढल्यास डीए 38 टक्क्यांवर पोहचेल. जर सरकारने डीए वाढवण्याचा निर्णय घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना तात्काळ याचा लाभ होत पगारात वाढ होईल. कोरोना महामारीमुळे काही काळ डीए वाढवण्यावर स्थगिती होती. दीड वर्षानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यात डीए 17 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के केला होता.

 

एवढं मिळेल वेतन –
सरकारने जुलैमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.
ज्याचं सामान्य वेतन 56 हजार 900 रुपये आहे. अशा कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 19 हजार 346 रुपये डीए मिळत होता.
आता जुलैमध्ये वाढ झाल्यास ही रक्कम 21 हजार 622 रुपये पर्यत जाऊ शकते.
म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जवळपास 2 हजार 276 रुपये प्रति महिना इतकी वाढ होऊ शकते.

 

Web Title :- Modi Government | modi central governments big gift to employees da hike for central government employees could increase in the month of july 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा