Modi Government | मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा ! 14 पिकांच्या हमीभावात 100 ते 500 रुपयांची वाढ; कोणत्या पिकाला किती हमीभाव ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) यंदाच्या 2022 – 23 च्या हंगामात 14 पिकांचे किमान हमीभाव (MSP) जाहीर करण्यात आले आहे. पिकांच्या हमीभावात 100 ते 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे (MPS Hike). या वाढीमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी केली आहे.

 

एमएसपी (MSP) नेमकं काय आहे ?
किमान आधारभूत किंमत ही किमान किंमत असते. ज्यावर सरकार (Modi Government) शेतकऱ्यांकडून पिकाची खरेदी करते. सरकार शेतकऱ्याला त्याच्याकडून खरेदी केलेल्या पिकावर जे पैसे देते त्याला एमएसपी (MSP) म्हणजे हमीभाव म्हणतात. रब्बी आणि खरीप हंगामात वर्षातून २ वेळा कृषी खर्च आणि मुल्य आयोगाच्या (CACP) शिफारसीनुसार सरकारकडून किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात येते.

 

नेमकं कोणत्या पिकाला किती हमीभाव ?

सोयाबीन – 4 हजार 300 रुपये (350 रुपयांची वाढ)

कापूस ( मध्यम धागा) – 6 हजार 80 रुपये प्रति क्विंटल (354 रुपयांची वाढ)

कापूस (लांब धागा) – 6 हजार 380 रुपये प्रति क्विंटल (355 रुपयांची वाढ)

तूर – 6 हजार 600 रुपये प्रति क्विंटल (300 रुपये वाढ)

तीळ 7 हजार 830 रुपये (523 रुपयांची वाढ)

मूग – 7 हजार 755 (480 रुपये वाढ)

सूर्यफूल – 6 हजार 400 (385 रुपयांची वाढ)

उडीद – 6 हजार 600 (300 रुपये वाढ)

मका 1 हजार 962 (92 रुपयांची वाढ)

भात (सामान्य) – 2040 (100 रुपयांची वाढ)

भात (ए ग्रेड) – 2060 (100 रुपयांची वाढ)

ज्वारी (हायब्रीड) 2 हजार 970 (232 रुपयांची वाढ)

ज्वारी (मालदांडी) 2 हजार 990 (232 रुपयांची वाढ)

कारळे – 7 हजार 287 (357 रुपयांची वाढ)

बाजरी – 2 हजार 350 (100 रुपयांची वाढ)

रागी – 3 हजार 578 (201 रुपयांची वाढ)

भूईमूग – 5 हजार 850 (300 रुपयांची वाढ)

 

Web Title :- Modi Government | Modi government announces 100 to 500 hike in msp for kharif season

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा