Modi Government | छोट्या उद्योगांसाठी मोठा दिलासा ! मोदी सरकारने नवीन योजना RAMP साठी 6062 कोटींची मंजूरी दिली, जाणून घ्या 10 मुद्द्यांमध्ये सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा देणार्‍या योजनेला मंजुरी दिली. मोदी सरकारने (Modi Government) या नवीन योजनेवर Rising and Accelerating MSME Performance (RAMP) 6,062.45 कोटी रुपये (808 मिलियन डॉलर) खर्च करण्यास मान्यता दिली. या कार्यक्रमाला जागतिक बँकेचा पाठिंबा आहे. ही योजना 2022 – 23 या आर्थिक वर्षात सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

6,062.45 कोटी रुपयांच्या एकूण खर्चापैकी 3750 कोटी रुपये (500 मिलियन डॉलर) हे जागतिक बँकेकडून कर्ज असेल. उर्वरित 2312.45 कोटी (308 मिलियन डॉलर) भारत सरकारद्वारे निधी दिला जाईल.

 

योजनेचे प्रमुख 10 मुद्दे

1 – RAMP ही जागतिक बँक सहाय्यित केंद्रीय क्षेत्र योजना आहे. या योजनेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MoMSME) अंतर्गत विविध योजना चालवल्या जातील. RAMP कार्यक्रम राज्यांमध्ये एमएसएमई व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करेल.

 

2 – कार्यक्रमाचा उद्देश बाजारपेठेतील प्रवेश आणि कर्जामध्ये सुधारणा करणे आहे. केंद्र आणि राज्यामध्ये संस्था आणि प्रशासन बळकट करणे, केंद्र – राज्य संबंध आणि भागीदारी सुधारणे, विलंबित पेमेंटच्या समस्यांचे निराकरण करणे आणि एमएसएमई मजबूत करणे. (Modi Government)

 

3 – RAMP कार्यक्रम सध्याच्या MSME योजनांचा प्रभाव वाढवण्यासाठी विशेषत: कठीण काळात काम करेल. या मदतीने, कोरोनाशी संबंधित आव्हाने सोडविण्यास मदत होईल.

 

4 – याशिवाय हा कार्यक्रम क्षमता वाढवणे, योजना विकास, गुणवत्ता वाढवणे, तंत्रज्ञान अपग्रेड करणे यासह या कार्यक्रमाशी संबंधित सर्व कामांना चालना दिली जाईल.

 

5 – RAMP स्वावलंबी भारत मिशनला पूरक म्हणून काम करेल. उद्योग मानके, एमएसएमईला स्पर्धात्मक आणि स्वावलंबी बनवण्यासाठी, निर्यात वाढवण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करेल.

6 – देशभरातील RAMP कार्यक्रमाचा MSME शी संबंधित सर्व 6 कोटी उद्योगांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फायदा होईल.
एकूण 5,55,000 MSME ला या योजनेंतर्गत चांगल्या कामगिरीसाठी विशेष लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

 

7 – याशिवाय, सेवा क्षेत्रांचा समावेश करण्यासाठी टार्गेट मार्केटचा विस्तार करणे हा योजनेचा एक भाग आहे.
यासोबतच सुमारे 70,500 महिला एमएसएमई निर्माण करण्याची योजना आहे.

 

8 – योजनेचे मुख्य ध्येय एमएसएमई कार्यक्रमाचा उद्देश संस्था आणि प्रशासन बळकट करणे हा आहे.

 

9 – बाजारपेठेशी संपर्क, फर्मची क्षमता आणि वित्तपुरवठा वाढवणे ही त्याची मुख्य उद्दिष्टे आहेत.

 

10 – RAMP चा एक महत्त्वाचा घटक म्हणजे धोरणात्मक गुंतवणूक योजना (SIP) तयार करणे आहे.
यामध्ये सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आमंत्रित केले जाईल. SIP मध्ये, RAMP अंतर्गत MSME ला ओळख देऊन मदत केली जाईल.

 

Web Title :- Modi Government | Modi government approves 6062 crores for new scheme ramp complete details in 10 points

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा