Modi Government | मोदी सरकारने आणखी 54 अ‍ॅप्सवर आणली बंदी, नवीन प्रतिबंधामध्ये चीनी अ‍ॅप्सचा सुद्धा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने (Modi Government) आणखी 54 मोबाईल अ‍ॅप्स (Mobile App) वर बंदी घातली आहे. नव्या बंदीत चिनी अ‍ॅप्सचाही (Chinese Apps) समावेश करण्यात आला आहे. भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचे कारण देत हे निर्बंध लादण्यात आले आहेत. नवीन प्रतिबंधित अ‍ॅप्समध्ये पूर्वी बंदी घातलेल्या अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे. क्लोनच्या रूपात ते पुन्हा समोर आले होते. (Modi Government)

 

2020 पासून एकूण 270 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर 2022 मध्ये सरकारने बंदी घातलेली ही पहिलीच अ‍ॅप्स आहेत. ईटी नाऊच्या अहवालाचा हवाला देत न्यूज 18 ने म्हटले आहे की, सरकारने आणखी 50 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

 

अहवालानुसार, Garena फ्री फायर नावाचा एक लोकप्रिय स्मार्टफोन गेम यापूर्वी Google Play Store आणि Apple App Store वरून गायब झाला होता आणि असे दिसत आहे की हा गेम भारतातील प्रतिबंधित अ‍ॅप्सच्या नवीन यादीमध्ये समाविष्ट असू शकतो. (Modi Government)

 

प्रतिबंधित अ‍ॅपच्या क्लोनवर बंदी
अहवालानुसार, यापूर्वीच बंदी घातलेली अ‍ॅप्स पुन्हा नवीन यादीमध्ये आहेत. बहुतेक या अ‍ॅप्सच्या क्लोनचा समावेश आहे. या अ‍ॅप्सवर 2020 पासून भारतात आधीच बंदी घालण्यात आली होती. आणखी 50 प्रतिबंधित अ‍ॅप्ससह, भारताने बंदी घातलेल्या अ‍ॅप्सची एकूण संख्या 320 पर्यंत पोहोचू शकते.

भारतात या अ‍ॅप्सवर अगोदरपासूनच बंदी
भारत सरकारने यापूर्वी टिकटॉक (TikTok) आणि PUBG मोबाईलसह अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.
PUBG Mobile ने काहीतरी करून भारतात पुनरागमन केले, Crafton ने नवीन कार्यालय स्थापन करून आणि त्याच्या चिनी भागीदारांशी संबंध तोडले.

अहवालानुसार, प्रतिबंधित अ‍ॅप्सच्या नवीन यादीमध्ये काही चिनी अ‍ॅप्ससह क्लोन अ‍ॅप्सचा समावेश आहे.

 

2020 मध्ये पहिल्या 59 अ‍ॅप्सवर बंदी
2020 मध्ये, लडाखमधील LAC वर भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला होता, तेव्हा टिकटॉकसह 59 चीनी अ‍ॅप्सवर पहिल्यांदा बंदी घालण्यात आली होती.
भारताने Tiktok, UC Browser, Share It, Hello, Likee, We Chat, Beauty Plus या लोकप्रिय अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.

यानंतर, सरकारने 47 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली, त्यापैकी बहुतेक एकतर आधीच प्रतिबंधित अ‍ॅप्सचे क्लोन होते किंवा त्यांच्यासारखेच होते.

यानंतर, सप्टेंबर 2020 मध्ये, भारताने लोकप्रिय गेमिंग अ‍ॅप PUBG सह आणखी 118 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली.
PUBG व्यतिरिक्त Livik, WeChat Work, WeChat Reading, Carrom Friends, Camcard या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.

 

Web Title :- Modi Government | modi government ban 54 more mobile apps in india chinese app

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा