Modi Government | CBI आणि ED च्या संचालकांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढणार? मोदी सरकारनं आणला अध्यादेश

वृत्तसंस्था – वृत्त संस्था  – Modi Government | केंद्रीय अन्वेषण विभाग Central Bureau of Investigation (CBI) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या Enforcement Directorate (ED) संचालकांचा कार्यकाळ आता 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. मोदी सरकारनं (Modi Government) याबाबत अध्यादेश (Ordinance) जारी केला आहे. सध्या केंद्रीय एजन्सीच्या (central agency) प्रमुखांचा कार्यकाळ हा 2 वर्षासाठी आहे.

आतापर्यंत दोन्ही केंद्रीय एजन्सीच्या प्रमुखांचा कार्यकाळ हा 2 वर्षासाठी कायम करण्यात आला होता.
काही अपवाद सोडता कार्यकाळ संपेपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या प्रमुखांना हटवलं जाऊ शकत नाही.
मोदी सरकार (Modi Government) एक वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देखील देऊ शकतं.

 

 

गतवर्षी केंद्र सरकारनं ED चे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवला होता.
मिश्रा यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपला.
सन 1997 पुर्वी सीबीआयच्या संचालकाचा (CBI Director) कार्यकाळ ठरलेला नव्हता आणि कोणत्याही प्रकारे केंद्र सरकार (Modi Government) त्यांना पदावरून हटवू शकत होती.
सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) विनीत नरैन प्रकरणी (Vineet Narain Case) निर्णय देताना सीबीआयच्या संचालकाचा कार्यकाळ हा किमान 2 वर्षासाठी असा असं ठरवून दिलं होतं.
संचालकांना काम करण्यास पुर्णपणे मोकळीक मिळेल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं कार्यकाळ ठरवून दिला होता.

आता मोदी सरकारनं CBI आणि ED च्या संचालकांच्या (ed director ) कार्यकाळाबाबत एक विधेयक आणलं आहे.
ज्यामुळे दोन्ही केंद्रीय एजन्सीच्या प्रमुखांचा कार्यकाळ हा 5 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.

Web Titel : Modi Government | Modi Government brings Ordinance to extend the tenure of Enforcement Directorate (ED) and Central Bureau of Investigation (CBI) Directors up to 5 years

 

हे देखील वाचा

World Diabetes Day 2021 | डायबिटीजमध्ये ‘हे’ 8 हेल्दी पदार्थसुद्धा शरीरावर करतात उलटा परिणाम, जाणून घ्या आणि दूर ठेवा

Milind Teltumbde | पोलिसांच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? जाणून घ्या तेलतुंबडेचं ‘रेकॉर्ड’

Nana Patole | दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट आरोप

SBI ATM | एसबीआयच्या एटीएममधून डेबिट कार्ड नसेल तरी काढू शकता पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा