Modi Government | मोदी सरकारची आणखी एक दिवाळी भेट, खाद्यतेलाच्या किमतीही होणार कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  इंधन दरावरील उत्पादन शुल्क कमी करुन मोदी सरकारने (Modi Government) देशातील सर्वसामान्यांना दिवाळी भेट दिली होती. त्यातच आता आणखी एक दिलासा मिळणार आहे. मागील वर्षभरापासून घरगुती तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आली किमतींमध्ये होणारी ही वाढ थांबवण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) शुक्रवारी (दि.5) क्रूड पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत शुल्क 2.5 टक्क्यांवरुन शून्यावर (cuts basic duties on edible oil) आणला आहे.

 

मोदी सरकारने (Modi Government) घेतलेल्या या निर्णयानुसार कच्च्या पाम तेलासाठी (Crude palm oil) असलेला कृषी उपकर 20 टक्क्यावरुन 7.5 टक्के आणि कच्च्या सोयाबीन तेल
(Crude soybean oil) आणि कच्च्या सूर्यफूल तेलासाठी (Crude sunflower oil) 5 टक्के वर आणल्याची माहिती वित्त मंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे. RBD पामोलिन ऑईल,
रिफाइंड सोयाबीन आणि रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलवरील मूळ शुल्क देखील 32.5 टक्क्यावरुन 17.5 टक्क्यापर्यंत कमी करण्यात आले आहेत.

 

केंद्र सरकारने करात कपात केल्यानंत क्रूड पाम तेलावरील प्रभावी शुक्ल 8.25 टक्के असेल.
कच्चा सोयाबीन तेल आणि कच्चा सूर्यफूल तेल प्रत्येकी 5.5 टक्के असेल.
करात कपात करण्यापूर्वी सर्व प्रकारच्या कच्चा खाद्य तेलांवर 20 टक्के कृषी पायाभूत सुविधा उपकर होता.

 

Web Title : Modi Government | Modi government cuts basic duties on edible oil retail price reduces

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Post Office च्या ‘या’ योजनेत मिळते FD आणि RD पेक्षा सुद्धा जास्त व्याज, काही वर्षातच जमा होतील लाखो रुपये

Dhananjay Munde | पंकजाताईंकडून दिवाळीच्या शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणाले…

Eknath Shinde | पोलिसांचा सण झाला गोड ! पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना भरवला ‘फराळ’