Modi Government | गहू, साखर निर्यातबंदीपाठोपाठ मोदी सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय; ग्लोबल मार्केटमध्ये प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) नुकतंच इंधन करकपात केली आहे. त्यानंतर खाद्यतेलाच्या (Edible Oil) दरातही घट केली आहे. त्याचबरोबर घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या खाद्यवस्तू आवश्यक साठा नसल्याने निर्यातीवर बंदी आणली जात आहे. अलीकडेच सरकारने गहू (Wheat) आणि साखरेच्या (Sugar) निर्यातीवर निर्बंध आणले आहेत. यानंतर आता तांदूळ (Rice) निर्यातीवर बंदी आणली जाणार अशी चर्चा पसरली आहे. याबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. (Modi Government May Be Ban Rice Export)

 

पाच गरजेच्या वस्तू निर्यात करण्यावर रोख आणण्याचा सरकारचा विचार आहे. यातील यादीमध्ये गहू, साखरेच्या निर्यातीवर यापूर्वीच बंदी आणली आहे. आता येणाऱ्या काळात तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याचा विचार सुरू आहे. बासमती तांदूळ (Basmati Rice) वगळता इतर तांदूळ निर्यात होणार नाहीत. गहू आणि साखरेप्रमाणेच तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. (Modi Government)

सूत्रांच्या माहितीनुसार, महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत आहे. खाद्यवस्तूंच्या किंमतीवर लक्ष ठेवणाऱ्या समितीने प्रत्येक उत्पादनाबाबत बैठक घेतली आहे. किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे लागेल, यावर विचार विनिमय सुरू आहे. यामध्ये साखरेबरोबरच तांदूळ निर्यातबंदी आणली जाऊ शकते असं सांगण्यात येत आहे.

 

दरम्यान, आधी देशातंर्गत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. त्यानंतर तांदूळ निर्यात केले जाईल हे खरेच आवश्यक आहे.
त्यामुळे लवकरच केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.
महत्वाचे म्हणजे भारताने 2021 – 22 मध्ये 150 हून अधिक देशांना तांदूळ निर्यात केला आहे.
त्यामध्ये भारताने विना बासमती तांदूळ निर्यातीवर सर्वात अधिक परदेशी चलन कमाई केलीय.
विशेष म्हणजे भारत जगातील तांदूळ निर्यातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

Web Title :- Modi Government | modi government ready to take decision on ban export rice after wheat and sugar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा