Modi Government | एअर इंडियानंतर आता आणखी एक सरकारी कंपनी विक्रीस; केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government | नुकतंच मोदी सरकारने एअर इंडियाच्या (Air India) संचालनाची जबाबदारी टाटा समूहाकडे दिली. यानंतर आता मोदी सरकारकडून (Modi Government) सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Central Electronins Ltd) या सरकारी कंपनीच्या विक्रीस मंजुरी देण्यात आली आहे. नंदल फायनान्स आणि लीजिंग (Nandal Finance Leasing) सीईएल खरेदी करणार आहे. सीईएलला 210 कोटी रुपयांना विक्री करण्यास परवानगी दिली आहे. यंदाच्या चालू आर्थिक वर्षातील ही दुसरी धोरणात्मक निर्गुंतवणूक (Strategic Disinvestment) असणार आहे.

 

जी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते ती सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (CEL) कंपनी 1974 मध्ये स्थापन झाली आहे.
कंपनी सोलर फोटोव्होल्टाईक्स (SPV) क्षेत्रात अग्रगण्य आहे आणि स्वतःच्या R&D प्रयत्नांनी तंत्रज्ञान विकसित केले गेले.
दरम्यान, कंपनीने ‘एक्सल काउंटर सिस्टमही’ (Axle Counter Systems) विकसित केलेय.
जी रेल्वे सिग्नलिंग सिस्टममध्ये (railway signaling system) ट्रेन सुरक्षितपणे चालवण्यासाठी वापरली जातेय.

 

दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh)
यांचा धोरणात्मक निर्गुंतवणूकीसाठी गठीत पर्यायी यंत्रणा (Alternative mechanisms) मध्ये समावेश आहे.
तसेच, निवेदनानुसार, चालू आर्थिक वर्ष 2021-22 (एप्रिल-मार्च) अखेरीस हा करार पूर्ण होण्याची अपेक्षा असणार आहे. (Modi Government)

सरकारने 3 फेब्रुवारी 2020 रोजी लेटर ऑफ इंटेंट (LoI) आमंत्रित केले होते. त्यानंतर ३ लेटर ऑफ इंटेंट मिळाली.
पण, नंदल फायनान्स अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड (Nandal Finance and Leasing Pvt. Ltd.) आणि जेपीएम इंडस्ट्रीज लिमिटेड (JPM Industries Ltd.) यांनी 12 ऑक्टोबर 2021 रोजी आर्थिक बोली सादर केली आहे. नंदल फायनान्स अँड लीजिंग प्रा. लि. 210 कोटी तर जेपीएम इंडस्ट्रीजने 190 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
दरम्यान, पर्यायी यंत्रणेने भारत सरकारच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधील शंभर टक्के इक्विटी स्टेक विक्रीसाठी नंदल फायनान्स अँड लीजिंग प्रा. लिने सर्वाधिक 210 कोटी रुपयांची बोली लावली होती.

 

Web Title : Modi Government | Modi government sells central electronics to nandal finance and leasing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Siddheshwar Sugar Factory | सिद्धेश्‍वर कारखाना बंद करण्याचे आदेश

Punit Pathak | प्रसिद्ध कोरियोग्राफरने पहिल्यांदा पत्नीला झोपेतून उठवलं अन् झाला रोमँटीक, बेडरुम व्हिडीओ झाला व्हायरल

Nikita Dutta | ‘कबीर सिंह’च्या अभिनेत्री सोबत भररस्तामध्ये घडला धक्कादायक प्रकार, अभिनेत्रीला बसला मोठा धक्का