Modi government | मोदी सरकार आज ‘ई-श्रम पोर्टल’ सुरू करणार, ३८ कोटी कामगारांना होणार लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने (Modi government) एक मोठा निर्णय घेतला आहे. कामगारांसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे देशातील साधारण ३८ कोटी कामगारांना या पोर्टलद्वारे लाभ होणार आहे. आज (२६ ऑगष्ट) रोजी मोदी सरकारकडून (Modi government) हे ई श्रम पोर्टल (E labor port) सुरु करण्यात येणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून बांधकाम कामगार व्यतिरिक्त प्रवासी कर्मचारी आणि घरेलू कर्मचारी यांना देखील याचा फायदा होणार आहे.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Union Ministry of Labor and Employment) दिलेल्या माहितीनुसार सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस (Database) तयार करत आहे. त्यासाठी हे पोर्टल सुरु केलं आहे. सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे एकीकरण करण्याचा उद्देश यामागे आहे. कर्मचाऱ्यांची माहिती राज्य सरकार आणि विभागांकडून देण्यात येईल. मंगळवारी (२४ आगष्ट) रोजी कामगार मंत्री भूपेंद्र यादव (Labor Minister Bhupendra Yadav) यांच्याकडून ई श्रम पोर्टलच्या (E labor port) लोगोचे अनावरण करण्यात आले होते.

Thane News | नारायण राणे विरुद्ध शिवसेना वादात ‘बदला’ घेण्याचा प्रयत्न; ठाण्यात शिवसेना शाखा प्रमुखावर ‘जीवघेणा हल्ला’

दरम्यान, गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे देशभर टाळेबंदी लावण्यात आली. त्यावेळी अनेक कामगारांचा हातचा रोजगार गेला. टाळेबंदी लागल्यामुळे अनेक कामगार वर्ग आपल्या घरी स्थलांतर झाले. कोरोनाच्या महामारीत कामगारांची आर्थिक बाजू बिकटली होती. त्यांनतर डेटाबेस (Database) तयार करण्याकडे लक्ष केंद्रित केले. यांनतर यंदाच्या कोरोनाच्या लाटेत देखील अशीच परिस्थिती निर्माण झालीय. कामगारांच्या सामाजिक कल्याण अथवा अन्य गरजा सहज पूर्ण करता येईल. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्राला लवकरात लवकर डेटाबेस तयार करण्यास सांगितलं होतं.

कशी होईल नोंदणी?
कामगारांच्या मदतीसाठी एक राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला आहे. 14434 या क्रमाकांच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. सरकार कामगारांना एक ई श्रम कार्ड (E labor port) देईल. देशभरात हे कार्ड वैध असेल. यामध्ये 12 अंकी युनिक क्रमांक असणार आहे. ई श्रम कार्ड देशातील कोट्यवधी असंघटीत कामगारांना एक नवीन ओळख मिळवून देणार आहे.

हे देखील वाचा

Solapur News | सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍याची सटकली, म्हणाले – ‘कलेक्टर साहेब, 2 एकर गांजा लावू द्या की…’

Pune Crime | … म्हणून न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर ! पती व सासर्‍यांवर गुन्हा दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Modi government | Modi government to launch ‘e-labor portal’ today, 38 crore workers to benefit

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update