Modi Government | PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा ! कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Modi Government | मागील तीन वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीत (Corona Epidemic) अनेक लोकांचे हाल झाले. अनेकांचा व्यवसाय डबघायला आला तर अनेकांची नोकरी गेली. अशातच त्या काळात अनेक बालकांना आपल्या आई – वडिलांना गमवावे लागले आहे. अनेक बालकांना नातेवाईक नसल्याने त्यांच्या जबाबदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे.

 

कोरोना महामारीत अनेक बालकांना आपल्या आई – वडिलांना गमवावे लागले आहे. अशा अनाथ मुलांची जबाबदारी (Responsibility Of Orphans) केंद्र सरकार (Modi Government) घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी केली आहे. यामुळे कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकारचा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 14 बालके आई – वडिलांविना पोरकी झालीत. पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत (PM Care for Children Schemes) मुलांना देण्यात येणारे लाभ, सेवा, अनाथ झालेल्या बालकांशी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ऑनलाईन संवाद साधला.

 

”मुलांनो तुमच्या आई – वडिलांचा मृत्यू भरून निघणार नाही पण देशातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत असेल. मनोरंजन, खेळाबरोबर मार्गदर्शक ठरणारी चांगली पुस्तके वाचा. खेलो इंडिया मध्ये सहभागी व्हा, योगामध्ये सामील व्हा. स्वत:वर विश्वास ठेवा, हार मानू नका. पीएम केअरमधून मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी किंवा खासगी शाळेत प्रवेश, पुस्तके, कपड्यांचा खर्च केंद्र सरकार करेल. व्यावसायिक शिक्षणासाठीही मदत करण्यात येईल.” अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी या मुलांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar), सहायक लेखाधिकारी के. बी. खरमाटे (K. B. Kharmate), जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले (Sanjay Chougale), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते (Sagar Date), बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले (Vaishali Butale), सदस्य ॲड. दिलशाद मुजावर (Adv. Dilshad Mujawar), ॲड. संजय मुंगळे (Adv. Sanjay Mungale), बाल न्याय मंडळाचे ॲड. एस. पी. कुरणे (Adv. S. P. Kurane), ॲड. रेवती देवाळपूरकर (Adv. Revati Devalapurkar) यांच्यासह बालके, त्यांचा सांभाळ करणारे पालक उपस्थित होते.

 

लाभ काय मिळणार ?
अनाथ मुलांची काळजी, संरक्षण, शिक्षणाद्वारे सक्षमीकरण करणे आणि 18 ते 23 वर्षांदरम्यान विद्यावेतन देण्यात येणार आहे.

23 व्या वर्षी एकरकमी 10 लाख रूपये केंद्र सरकारचे आणि 5 लाख रुपये राज्य सरकारचे दिले जातील.

प्रत्येक महिन्याला 4 हजार रूपये देण्यात येणार असून पहिली ते 12 वीपर्यंत 20 हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

तांत्रिक शिक्षणासाठी 50 हजार रुपये शिष्यवृत्ती असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून दरवर्षी आरोग्य विमा असेल.

 

Web Title :- Modi Government | modi government to take responsibility for children orphaned by corona announces prime minister narendra modi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा