Modi Government | मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलनंतर आणखी एक दिलासा; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंधन दरात सातत्याने होणाऱ्या वाढीने सर्वसामान्य जनता त्रासली असतानाच आता मोदी सरकारने (Modi Government) बुधवारी उत्पादन शुल्कात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ऐन दिवाळीत घेतलेल्या या निर्णयामुळे पेट्रोल ५ तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले आहे. इतकाच नाही तर कांद्याचे वाढते दरही (onion price) नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारनं (Modi Government) प्रयत्न सुरू केले आहेत.

 

देशभरात असलेल्या बाजारांमधील मोदी सरकारने (Modi Government) आपला बफर स्टॉक कमी केला आहे. त्यामुळे आता बाजारात १.११ लाख टन कांदा आला असल्याने कांद्याची आवक वाढल्यानं किलोमागे ५ ते १२ रुपयांचा दिलासा मिळाला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, गुवाहाटी, भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, चंदिगढ, कोच्ची आणि रायपूर यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये केंद्राकडे असलेला बफर स्टॉक (release buffer stock) आणला गेला आहे. याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील स्थानिक बाजारांमध्येदेखील अधिकच्या कांद्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात ग्राहक मंत्रालयं माहिती दिली आहे. केंद्र सरकारने कांद्याचे दर कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसू लागले आहेत. गतवर्षीच्या तुलाना केली तर कांदा यंदा स्वस्त झाला आहे. किरकोळ बाजारातील दर सरासरी  ४०.१३ रुपये असून होलसेल बाजारात हाच दर ३१.१५ रुपये इतका आहे, असेही मंत्रालयाने सांगितले.

प्रमुख बाजारांमध्ये बफर स्टॉकमधील १,११,३७६.१७ टन कांदा २ नोव्हेंबरपर्यंत आणला गेला आहे.
त्यामुळे कांद्याच्या दरात किलोमागे ५ ते १२ रुपयांची घसरण झाल्याने मंत्रालयाने सांगितले.
१४ ऑक्टोबरला मुंबईत कांद्याचा दर ५० रुपये किलो होता तर दिल्लीत ४९ रुपयांना तो विकला जात होता.
मात्र आता अनुक्रमे ४५ आणि ४४ रुपये किलोने विकला जात आहे.

 

Web Title :- Modi Government | modi government took big step cut onion price release buffer stock

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | केंद्र सरकारने कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात ‘कपात’; जाणून घ्या पुण्यातील दर

Pune Crime | 200 वाहन चोरी करणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड, 36 लाखांच्या 51 दुचाकी जप्त

Diwali 2021 | दिवाळीच्या रात्री आवश्य खा ‘ही’ एक गोष्ट; ‘प्रगती’-‘आनंदा’ला लागणार नाही कुणाची ‘नजर’

Tax Refund | करदात्यांची दिवाळी ! CBDT ने 91.30 लाख करदात्यांना केला 1.12 लाख कोटी रुपयांचा कर परतावा