Modi Government | रस्ता दुर्घटनेत जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहचवणार्‍यांना बक्षीस देणार मोदी सरकार, जाणून घ्या किती मिळेल रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  Modi Government | केंद्र सरकार रस्ता दुर्घटनेत गंभीरप्रकारे जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहचवणार्‍या नागरिकांना रोख बक्षीस आणि पशस्तीपत्रक देणार आहे. या योजनेंतर्गत जिल्हा प्रशासन चांगल्या नागरिकांना एक वर्षात 5000 रुपयांचे रोख बक्षीस कमाल पाचवेळा देईल. दरवर्षी होणार्‍या सरकारी (Modi Government) सन्मान सोहळ्यात त्यांना एक लाख रुपये रोख दिले जाईल.

जखमींना लवकर उपचार मिळावा

ही योजना मार्च 2026 पर्यंत चालेल. याचा हेतू दुर्घटनेत रस्त्यावर पडलेल्या गंभीर जखमींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी नागरिक त्यांना जवळच्या हॉस्पिटल-ट्रॉमा सेंटरपर्यंत पोहचवतील.

मार्गदर्शकतत्व जारी

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सोमवारी रस्ते दुर्घटनेत गंभीर जखमींना गोल्डन अव्हर (दुर्घटनेच्या एक तासाच्या आत) मध्ये हॉस्पिटल-ट्रामा सेंटरमध्ये पोहचवणार्‍या नागरिकांसाठी बक्षीस योजना संबंधी मार्गदर्शकतत्व जारी केली आहेत.
मंत्रालयाने मागील वर्षी रस्ते सुरक्षेवर काम करणारे ट्रस्ट, एनजीओ, संस्थांना वार्षिक पाच लाख रुपये देणे आणि आर्थिक मदत देणाची योजना सुरू केली.

केंद्र 5 लाख रूपये देणार

ही योजना 15 ऑक्टोबर 2021 पासून मार्च 2026 पर्यंत चालेल. यामध्ये उल्लेख आहे की राज्य सरकार या रोख बक्षीस योजनेसाठी बँक खाते उघडेल.
केंद्र सरकार सुरुवातीच्या काळात पाच लाख रुपये पुरवणार आहे.

नवीन पोर्टल सुरू होईल

रस्ते परिवहन मंत्रालय नवीन पोर्टल सुरू करणार आहे. जिल्हा प्रशासन दरमहिना जखमींना मदत करणार्‍या नागरिकांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर,
घटना इत्यादी माहिती त्या पोर्टलवर नोंदणार आहे.

या आहेत अटी

स्थानिक पोलीस किंवा हॉस्पिटल-ट्रॉमा सेंटर प्रशासन सुद्धा पोर्टलवर अपलोड करू शकतील. फेटल अ‍ॅक्सीडेंटमध्ये जखमींची सर्जरी,
तीन दिवसापर्यंत हॉस्पिटलमध्ये दाखल राहणे आणि स्पाइन कॉर्ड सर्जरीचा समावेश केला आहे. (Modi Government)

 

Web Title : Modi Government | modi government will reward those injured in road accident know how much amount

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

WhatsApp आणतंय Voice मेसेजसाठी अतिशय विशेष फीचर, यूजर्सला मिळेल नवीन ‘ऑपशन’; जाणून घ्या

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येऊ शकतात 2000 ऐवजी 4000 रुपये, परंतु यांना मिळणार नाही ‘लाभ’

Yavatmal Crime | खळबळजनक ! काँग्रेस शहर अध्याक्षाच्या घरात रंगला जुगाराचा अड्डा, 14 जणांना ठोकल्या बेड्या