Modi Government | सुरक्षेत ‘आत्मनिर्भर’ होणार रेल्वे ! दोन ट्रेनची धडक रोखणार्‍या ‘स्वदेशी’ प्रणालीला सरकारची मंजूरी

मोदी सरकारनं (Modi Government) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेला 4जी बँड म्हणजे 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये 5 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमसुद्धा मंजूर केले

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Modi Government | देशात रेल्वे प्रवास सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी सरकारने बुधवारी टीसीएएस सारख्या स्वदेशी सुरक्षा प्रणालीला मंजूरी दिली. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेला 4जी बँड म्हणजे 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये 5 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमसुद्धा मंजूर केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय रेल्वेला 700 मेगाहर्र्ट्ज फ्रीक्वेन्सी बँडमध्ये 5 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम वाटपाला मंजूरी दिली. या स्पेक्ट्रममुळे रेल्वेला स्टेशन परिसर तसेच रेल्वेगाड्यांमध्ये सार्वजनिक बचाव आणि सुरक्षा सेवा चांगल्या करण्यास मदत होईल.

25,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक
या स्पेक्ट्रमसोबत भारतीय रेल्वे आपल्या रेल्वेमार्गावर एलटीई (लाँग टर्म इव्हॉल्यूशन) आधारित मोबाइल ट्रेन रेडियो कम्युनिकेशन प्रदान करेल. यामुळे लोको पायलट (ट्रेन ड्रायव्हर) आणि ट्रेन गार्डमध्ये चांगला संवाद स्थापन होऊ शकतो. सोबतच स्टेशन, ट्रेन आणि कंट्रोल रूममध्ये सुद्धा कम्युनिकेशन चांगले होईल. यामुळे रेल्वेमार्गाच्या सुरक्षेत वाढ होईल. हा प्रोजेक्ट पुढील 5 वर्षात पूर्ण केला जाणार आहे, ज्यावर 25,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज आहे.

स्वदेशी तंत्रज्ञान रोखणार ट्रेनची धडक
याशिवाय भारतीय रेल्वेने स्वदेशी प्रकारे विकसित ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टम (टीसीएएस) ला सुद्धा मंजूरी दिली आहे. ही एक ऑटोमॅटिक ट्रेन सुरक्षा प्रणाली आहे जी रेल्वेगाड्यांची धडक टाळण्यास मदत करेल. यामुळे रेल्वे दुर्घटना कमी होतील आणि प्रवाशांची सुरक्षा चांगली होईल.

अमित शाह यांचे ट्विट
सरकारच्या या महत्वाच्या निर्णयाबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, देशात ट्रेनच्या वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी मोदी सरकाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा

आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45%

नेपाळमध्ये पतंजलीच्या कोरोनिल किटच्या विक्री आणि वितरणावर का लावला गेला प्रतिबंध?

‘बारिश क्या हुई मिट्टी की फितरत बदल गई…’ अमृता फडणवीसांचा शायरीतून शिवसेनेला टोला

Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात आज 300 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांचे निदान

व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या व खंडणी मागणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार; पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या निवेदनानंतर पोलिसांकडून आश्वासन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा