Modi Government | ‘पूर’, ‘भूकंप’, ‘आग’ लागल्यापासून घराला सुरक्षा ‘कवच’ देईल मोदी सरकार ! आणणार ‘ही’ सर्वात मोठी स्कीम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Modi Government | प्रत्येक वर्षी पूर, भूकंप, आग लागणे किंवा कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीत लाखो लोकांची घरे उध्वस्त होतात. यापैकी बहुतांश कुटुंबे अशी असतात ज्यांच्यासाठी पुन्हा घर बनवणे अशक्य असते. मोदी सरकार (Modi Government) आता लोकांसाठी होम इन्श्युरन्सशी संबंधीत एका मोठ्या योजनेवर काम करत आहे.

अशी आहे केंद्र सरकारची होम इन्श्युरन्स स्कीम!

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) प्रमाणे मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरांच्या सुरक्षेची विमा योजना लाँच करणार आहे. नैसर्गिक आपत्तीत या योजनेंतर्गत सरकार 3 लाख रुपयांपर्यंत इन्श्युरन्स कव्हरेज देईल, सोबतच 3 लाख रुपयांपर्यंत कव्हरेज घरातील सामानाचे असेल आणि 3-3 लाख रुपयांपर्यंत पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर पॉलिसी घेणार्‍या कुटुंबातील दोन लोकांना दिले जाईल.

किती असेल प्रीमियम ?

या पॉलिसीची रूपरेषा व्यापक प्रकार तयार आहे. मात्र, केवळ प्रीमियमवरून ती अटकलेली आहे. इन्श्युरन्स कंपन्यांकडून प्रति पॉलिसी 1000 रुपयांच्यावर कोटेशन देण्यात आले आहे. परंतु केंद्र सरकार ते 500 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यास इच्छुक आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी दोन्ही कंपन्या आहेत. प्रीमियमबाबत अजून चर्चा सुरू आहे.

योजना गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा

सरकारची ही स्कीम कंझ्युमर आणि विमा कंपन्या दोन्हींसाठी गेम चेंजर ठरू शकते,
असा दावा करण्यात येत आहे. सरकार यावर काम करत आहे.
केंद्र सरकारची योजना जनरल इन्श्युरन्स कंपन्यांद्वारे होईल आणि प्रीमियम लोकांच्या बँक अकाऊंटशी लिंक होईल, जसे PMJJY, PMSBY योजनांमध्ये होते.

Web Title : Modi Government | modi govt to rollout home insurance scheme with rs 3 lakh sum assured see the details

Real Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी

Weight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर हे केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या

Police Officers Transfer | पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

Indian Oil | इंडियन ऑईलची जबरदस्त ऑफर ! ‘डिझेल भरा, बक्षिसं जिंका’ ऑफरमधून 2 कोटी जिंकण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या ऑफर