Modi government | PM मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचा व्यापाऱ्यांना सल्ला; म्हणाले – ‘मागण्या मान्य होईपर्यंत जीएसटी भरु नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Modi government | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi government) तसेच महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर (Thackeray government) घणाघाती टीका केली आहे. उल्हासनगर (Ulhasnagar) ट्रेड असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापाऱ्यांशी संवाद साधताना प्रल्हाद मोदी हे उपस्थित होते. या सवांदादरम्यान त्यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचं आवाहन देखील केलं आहे. व्यापाऱ्यांना जीएसटीन भरण्याचा सल्ला देत. मागण्या मान्य होईपर्यंत जीएसटी (GST) भरु नका असा सल्ला देखील प्रल्हाद मोदींनी व्यापाऱ्यांना दिला आहे. प्रल्हाद मोदीं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi government) यांचे लहान भाऊ आहेत. तर सध्या ते अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.

काय म्हणाले प्रल्हाद मोदी ?

उल्हासनगरमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे (Lockdown) संकटात अडकलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी (Pralhad Modi) यांनी भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या प्रल्हाद मोदी यांच्याकडे मांडल्या आहेत. त्यावेळी बोलताना प्रल्हाद मोदीनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी असो की आणखी कुणी, त्यांना तुमचं ऐकावंच लागेल. आपण लोकशाही राहतो, गुलामगिरीत नाही, तसेच, इतकंच काय तर त्यांनी व्यापाऱ्यांना GST न भरण्याचा सल्ला दिला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत GST भरणार नाही, अशा प्रकारचं आंदोलन करा. व्यापाऱ्यांनीच असं केलं तर उद्धव ठाकरेच काय नरेंद्र मोदीही तुमच्या दारात येतील. असं प्रल्हाद मोदी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना प्रल्हाद मोदी म्हणाले, ‘आज मी तुम्हाला सांगतोय, आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहा. त्यांना सांगा, आमचं ऐकून घेईपर्यंत आम्ही GST भरणार नाही. असं व्यापाऱ्यांना संगितलं. तसेच, मोदी चहावाले नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चायवाला म्हणण्यापेक्षा चायवाले का बेटा असं म्हणा असं देखील प्रल्हाद मोदींनी (Pralhad Modi) म्हटलं आहे. ‘आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो.
ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची.
परंतु, चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते.
आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा सहा भावंडांना मोठं केलं.
म्हणून आम्ही सर्व चायवाले के बेटे आहोत, असं त्यांनी कार्यक्रमावेळी सांगितलं आहे.

Web Title : Modi Government | narendra modi brother prahlad modi do not
pay gst see how the government will listen to you to ulhasnagar traders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये; फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ; धक्कादायक माहिती समोर

Vacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त; संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट