Modi Government | मोदी सरकारकडून शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! 3 लाखांच्या कर्जावर दीड टक्के व्याज सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | नरेंद्र मोदी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत (Modi Cabinet Meeting) शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा दिला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहे. त्यानुसार बैठकीत 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर (Short Term Agricultural Loans) दीड टक्के सवलत मंजूर केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Union Minister Anurag Thakur) यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या योजने अंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 34 हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे असे ठाकूर यांनी सांगितले. (Modi Government)

 

अनुराग ठाकूर यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात पुरेशी कर्जे मिळू शकणार आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याशिवाय क्रेडिट लाइन हमी योजनेच्या (Credit Line Guarantee Scheme) निधीतही वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
सरकारच्या (Modi Government) या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर (Union Agriculture Minister Narendra Tomar) यांनी यापूर्वीच सांगितले होते की,
सरकार कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे.
त्यामुळे खेड्यापाड्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
त्या दृष्टीने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे.

 

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (Indian Council of Agricultural Research)
व्याख्यानांच्या मालिकेच्या समारोप कार्यक्रमात तोमर म्हणाले होते की,
यावेळी केवळ रोजगाराच्या संधीच निर्माण होणार नाहीत तर शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि शाश्वत उपाय शोधून शेतकऱ्यांना समृद्ध करता येईल आणि शेतीचे आधुनिकीकरण करता येईल.
केंद्राने कृषी क्षेत्रात पूर्ण पाठिंबा देण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या असून राज्य सरकार यांच्या सहकार्यातून हे काम प्रगतीपथावर असल्याचे ठाकुर यांनी सांगितले.

 

Web Title : –  Modi Government | narendra modi government gift to indian farmers big relief one and a half percent rebate on loan up to 3 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा