मोदी सरकारच्या ‘या’ खास योजनेमुळे शेतकर्‍यांना मिळणार २४ लाखाची मदत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी योजना आखली असून यामध्ये शेतकरी शेतीसाठी लागणारी अवजारे आणि मोठ्या मशिन्स घेऊन त्या भाड्याने देऊन त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवू शकतात. जर कुणी शेतकरी अशा प्रकारच्या मशिन्स खरेदी करण्यासाठी इच्छुक असेल तर केंद्र सरकार या शेतकऱ्यांना २४ लाख रुपयांपर्यंत सबसिडी देखील देणार आहे. फक्त शेती करणे सोपे बनवणे नाही तर याद्वारे उत्पन्न देखील वाढवण्याचा या मागचा उद्देश आहे. यासाठी केंद्र सरकार राज्यांना मोठ्या प्रमाणात फंड देत असून तुम्हाला तुमच्या राज्याच्या कृषी विभागाच्या इंजीनियरिंग विभागाशी संपर्क साधावा लागणार आहे.

असे मिळवा २४ लाख रुपये

कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी केंद्र सरकार कस्टम हायरिंग सेंटर उभारणार आहे. यासाठी सरकार ४० टक्के रक्कम स्वतः देणार आहे. याअंतर्गत तुम्ही ६० लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प उभा करू शकता. या प्रकल्पामध्ये सरकार तुम्हाला २४ लाखांपर्यंत मदत करू शकते. याचबरोबर तुम्ही एक को ऑपरेटिव्ह ग्रुप बनवून देखील या मशीन तयार करू शकता. मात्र या साठी ग्रुपमध्ये कमीतकमी ६ ते ८ शेतकरी असायला हवेत. ग्रुपचा जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प पास होऊ शकतो म्हणजेच तुम्हाला कमीत कमी ८ लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते. आतापर्यंत देशभरात २० हजार कृषी यंत्र बँक तयार झाल्या आहेत.

Modi Government Scheme Farmer Gets 24 Lac rupess

सरकारी दरावर भाड्याने द्यावी लागणार यंत्र

१) यामध्ये उत्तर प्रदेशच्या कृषी विभागाने काढलेल्या आदेशानुसार, या प्रकल्पासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची नसेल.

२) तयार केलेल्या प्रकल्पाच्या कार्यालयात अटेंडेंस रजिस्टर, यंत्र रजिस्टर, भाडे दर, मशीन मुव्हमेंट रजिस्टर, भाड्याचे पावती बुक, त्याचबरोबर बॅलेन्स शीट देखील ठेवावी लागणार आहे.

३) मालकाच्या नावे रस्त्याच्या कडेला यासाठी शेड उभारण्यासाठी जमीन हवी. कार्यालय देखील असायला हवे. त्याचबरोबर कराराप्रमाणे तो पाच वर्षांपर्यंत ही यंत्रे विकू शकत नाही.

Modi Government Scheme Farmer Gets 24 Lac rupess

असा करा अर्ज

तुमच्या राज्यातील कृषी विभागाशी संपर्क साधून यासाठी ऑनलाईन अर्ज करावा. यामध्ये निवासाचा पुरावा, उत्त्पन्न प्रमाणपत्र, बँकेत कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र त्याचबरोबर शेतीचे कागदपत्र असणे गरजेचे आहे. त्यानंतर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. त्यानंतर बँकेकडून प्रकल्प पास झाल्यानंतर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.

आरक्षण देखील आहे

या योजनेत ३० टक्के आरक्षण महिलांसाठी देखील आहे. त्याचबरोबर ५० टक्के सामान्य शेतकऱ्यांना तर अनुसूचित जाति मधील शेतकऱ्यांना १६ टक्के तर अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांना ८ टक्के आरक्षण आहे.

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे