Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! SIM card बाबत ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Modi Government | मोदी सरकारने (Modi Government) मोबाईल सिम कार्डबाबत (SIM card) एक मोठा निर्णय घेेतला आहे. आता नवीन कनेक्शन घेतल्यास किंवा प्रीपेड (Prepaid) नंबरला पोस्टपेड (Postpaid) मध्ये अथवा पोस्टपेडला प्रीपेडमध्ये बदलण्याची प्रोसेस खूप सोपी केली आहे. त्याचबरोबर यापुर्वीच्या प्रमाणे कोणताही फिजिकल फॉर्म भरायचा नाही. टेलिकॉम कंपन्या या फॉर्म भरण्याचे काम डिजिटल पद्धतीद्वारे करु शकणार आहेत. अर्थात आपणाला घरबसल्या काम करता येईल. असा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबर रोजी कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत मोदी सरकारकडून या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
या नव्या नियमांनुसार हे E-KYC अ‍ॅपवर आधारित असेल.
अर्थात सेवा देणारी कंपनी अ‍ॅपवर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करतील.
ज्याच्या सहाय्याने KYC होईल.
सेल्फ KYC साठी तुम्हाला केवळ 1 रुपया खर्च करावा लागणार आहे.
अशी माहिती ‘PIB’ च्या वेबसाइटवरून दिली आहे.

जर कोणताही ग्राहक आपल्या प्रीपेड नंबरला पोस्टपेड मध्ये अथवा पोस्टपेड मधून प्रीपेडमध्ये चेंज करीत असेल तर प्रत्येकवेळी केवायसी प्रोसेस पूर्ण आवश्यक आहे.
मात्र. केवळ एकदा KYC करावी लागणार आहे.

 

काय आहे सेल्फ KYC?

KYC साठी कंपनी ग्राहकांना काही डॉक्युमेंट मागते. पुर्वी हे काम खुद्द ग्राहक सेवा केंद्रात जावून होत होते. मात्र, आता हे स्वतः ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर डॉक्युमेंट अपलोड करू शकता.
तुमच्या KYC करीता सेल्फ केवायसी म्हणतात. हे वेबसाइट किंवा अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून केलं जावू शकणार आहे.

Self KYC च्या माध्यमातून सगळ्यात पुर्वी सिम प्रोव्हाइडरचे अ‍ॅप्लिकेशन फोनमध्ये डाउनलोड करा.

त्यानंतर एक अपर्यायी नंबर देखील द्यावा लागेल. जो तुमच्या ओळखीचा असेल.

यानंतर OTP येईल.

यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.

यात सेल्फ KYC चा ऑप्शन निवडावा लागणार आहे.

 

Web Title :  Modi Government | now its easy to convert prepaid sim to postpaid sim modi government has changed rules no kyc needed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Modi Birthday | अजित पवार यांनी दिल्या PM मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा; महाराष्ट्राचा उल्लेख करत म्हणाले…

Gold Price Today | खुशखबर ! 5 महिन्यामधील सर्वात स्वस्त मिळतंय सोने, विक्रमी किमतीपासून 10 हजार रुपयांनी कमी झाला दर

High Court | कुणीही घेऊ शकत नाही 2 प्रौढ व्यक्तींच्या संबंधाला आक्षेप, मग ते आई-वडील असले तरीही – हायकोर्ट