Modi Government On Layer’r Shot Ads | मोदी सरकारचा युट्युब-ट्विटरला दणका, लैंगिक हिंसेला प्रोत्साहन देणारी ‘ती’ जाहिरात काढण्याचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government On Layer’r Shot Ads | सध्या सोशल मीडियावर एक परफ्यूम ब्रँडच्या जाहिराती व्हायरल होत आहेत. या जाहिरातींवर यूजरसकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. लेयर शॉट या परफ्यूमच्या (Layer Shot Ad Controversy) जाहिरातीवर सोशल मीडिया (Social Media) यूजर्स कडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या जाहिरातीत महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला (Sexual Violence) प्रोत्साहन देत असल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. सोशल मीडियावरील प्रतिक्रियेनंतर आता केंद्र सरकारने (Central Government) सोशल मीडिया कंपनी युट्यूब आणि ट्विटरला या जाहिराती प्लॅटफॉर्मवरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत. मोदी सरकारच्या (Modi Government) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry of Information and Broadcasting)  हे आदेश दिले आहेत. (Modi Government On Layer’r Shot Ads)

 

 

पीआयबीच्या (PIB) ट्विटमध्ये म्हटले आहे की, हे व्हिडिओ सभ्यता आणि नैतिकतेच्या हितासाठी महिलांच्या चित्रणासाठी हानिकारक आहे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहितेचे उल्लंघन आहे.

 

https://twitter.com/RishitaPrusty_/status/1532632641815515136?s=20&t=XDSAIgHsgzjEJicJF-rHKg

एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या लक्षात आले आहे की सोशल मीडियावर परफ्यूमची अयोग्य आणि अपमानास्पद जाहिरात प्रसारित केली जात आहे. मंत्रालयाने ट्विटर आणि यूट्यूबला या जाहिरातीचे सर्व व्हिडिओ त्वरित काढून टाकण्यास सांगितले आहे.

 

 

ट्विटर आणि यूट्यूबला लिहिलेल्या पत्रात मंत्रालयाने म्हटले की, अॅडव्हर्टायझिंग स्टँर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) ला देखील हे व्हिडिओ त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. या कारणामुळे जाहिरातदाराला तात्काळ जाहिरात काढून टाकण्यास सांगितले आहे.

 

Web Title :- Modi Government On Layer’r Shot Ads | Modi Government’s I&B ministry tells YouTube, Twitter to remove ‘inappropriate’ Layer’r Shot ads, stops TV telecast

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा