सर्वसामान्यांसाठी मोठी खुशखबर ! रेशन कार्डबाबत मोठी घोषणा, लवकरच ‘या’ 14 राज्यात लागू होणार ‘ही’ महत्वकांक्षी योजना

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना ’वन नेशन, वन रेशन कार्ड’ 1 जूनपासून 17 राज्यांत लागू झाली आहे. ÷अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, देशभरातील नागरिक आपल्या वाट्याचे रेशन; देशातील कोणत्याही रेशन दुकानातून घेऊ शकतात, यासाठी देशात वन नेशन-वन रेशनकार्ड ही सुविधा लागू करण्यात येत आहे. आता लवकरच उर्वरित 14 राज्यात सुद्धा ही योजना लागू होईल.

ही योजना लागू झाल्यानंतर लाभार्थी देशातील कोणत्याही भागातून कोणत्याही रेशन दुकानदाराकडून आपल्या वाट्याचे रेशन घेऊ शकतात. नागरिकांना जुने रेशन कार्ड परत करावे लागणार नाही किंवा नव्या ठिकाणी रेशन कार्ड बनवावे लागणार नाही. कोणत्या राज्यात केव्हापर्यंत लागू होऊ शकते ही योजना, ते जाणून घेवूयात…

येथे झाली आहे लागू

ही योजना आतापर्यंत आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगना, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि दमण-दीवसह 17 राज्यात लागू झाली आहे.

या राज्यांमध्ये लवकरच होणार लागू

लवकरच ही योजना ओडिसा, नागालँड आणि मिझोरम राज्यात सुरू झाल्याने ती एकुण 20 राज्यात असेल. यासोबत 1 ऑगस्ट 2020 ला उत्तराखंड, सिक्किम आणि मणिपुरसह आणखी 3 राज्य या योजनेत सहभागी होतील.

जाणून घ्या या राज्यांचे स्टेटस

* दिल्लीत वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत पीडीएस दुकानांवर ई-झेड मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 100% आधार सीडिंग झाले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आले आहे की, सप्टेंबरच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होईल आणि 1 ऑक्टोबरपासून परीक्षण सुरू केले जाईल.

* लडाखमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत काम अंतिम टप्प्यात आहे. 100% ई-पॉस मशीन्स बसविल्या आहेत आणि 91% आधार सीडिंग केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितले गेले की, ही तयारी सप्टेंबरच्या अखेरीस पूर्ण केली जाईल आणि 1 ऑक्टोबरपासून याची सुरूवात होऊ शकेल.

* उत्तराखंडमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत तयारी अंतिम टप्प्यात आहे. येथे 77% ई-पॉस मशीन्स बसविल्या आहेत. आणि 95% आधार सीडिंग केले आहे. चाचणीचे काम प्रगतीपथावर आहे. ऑगस्टच्या अखेरीस ही योजना संपूर्ण राज्यात लागू केली जाऊ शकते, असे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आले.

* प. बंगालमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत काम चालू आहे. येथे 100% ई-पॉस मशीन्स बसविल्या आहेत आणि 80% आधार सीडिंग केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आले की, हे काम डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण केले जाईल आणि जानेवारी 2021 पर्यंत ही योजना लागू केली जाऊ शकते.

* जम्मू-काश्मीरमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत काम जवळपास पूर्ण झाले आहे. 100% ई-पॉस मशीन्स बसविण्यात आल्या असून 86% आधार सीडिंग करण्यात आले आहे. जुलैच्या अखेरीस ही योजना काही जिल्ह्यात सुरू केली जाईल आणि नोव्हेंबरपर्यंत सर्व जिल्ह्यात लागू केली जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

* तामिळनाडूमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत काम वेगाने सुरू आहे. येथे 100% ई-पॉस मशीन्स बसविल्या आहेत आणि 100% आधार सीडिंग केले आहे. सप्टेंबरच्या अखेरीस हे काम पूर्ण होईल आणि 1 ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात ही योजना राबविली जाऊ शकते, असे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आले.

* अंदमान निकोबारमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत काम जोरात सुरू आहे. 96% ई-पॉस मशीन स्थापित केली गेली आहे आणि 98% आधार सीडिंग करण्यात आले आहे. जुलैच्या अखेरीस हे काम पूर्ण होईल आणि ऑगस्टपासून ही चाचणी सुरू केली जाईल, असे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आले.

* अरुणाचल प्रदेशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत काम सुरू आहे. पीडीएस मशीन लवकरच बसविल्या जातील. 57% आधार सीडिंग केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आले की 1 जानेवारी 2021 पर्यंत ही योजना लागू केली जाऊ शकते.

* छत्तीसगडमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत काम जोरात सुरू आहे. येथे 98% ई-पॉस मशीन्स बसविण्यात आल्या आहेत आणि 98% आधार सीडिंग झाले आहे. जुलैच्या अखेरीस हे काम पूर्ण होईल आणि ऑगस्टपासून ही चाचणी सुरू केली जाईल, असे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आले.

* मणिपूरमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत तयारी पूर्ण झाली असून चाचणी व तपासणीचे काम सुरू आहे. येथे 61% ई-पॉस मशीन आणि 83% आधार सीडिंग केले गेले आहे. जुलै अखेर संपूर्ण राज्यात ही योजना लागू करता येईल, असे बैठकीत सांगण्यात आले. ही योजना 1 ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे.

* एक नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत मेघालयात पीडीएस दुकानांवर ई-पॉस मशीन बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे काम नोव्हेंबरच्या अखेरीस पूर्ण केले जाईल आणि 1 डिसेंबरपासून ही चाचणी सुरू केली जाईल, असे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आले.

* नागालँडमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत तयारी पूर्ण केली गेली असून चाचणी सुरू आहे. येथे 96% ई-पॉस मशीन्स बसविण्यात आल्या आहेत आणि 73% आधार सीडिंग केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आले की 1 ऑगस्टपासून ही योजना संपूर्ण राज्यात लागू केली जाऊ शकते.

* लक्षद्वीपमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेंतर्गत काम जोरात सुरू आहे. येथे 100% ई-पॉस मशीन बसवल्या आहेत आणि 100% आधार सीडिंग केले गेले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगण्यात आले की इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे, ती दूर करण्याचे काम चालू आहे.