खुशखबर ! दरमहा ‘फक्‍त’ हजाराची ‘बचत’ करून मिळवा २ लाख, आयुष्यभरासाठी ५ हजाराची ‘पेन्शन’ चालू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवृत्तीनंतर देखील आपल्याला पैसे मिळावेत अशी प्रत्येक सामान्य माणसाची इच्छा असते. त्यामुळे सामान्य माणूस तरुणपणात अनेक योजनांमध्ये पैसे गुंतवत असतो जेणेकरून निवृत्त झाल्यावर आपल्याला पैश्यांची चणचण भासू नये. पोस्टाच्या देखील अशा प्रकारच्या अनेक योजना असतात. यामध्ये अनेक पेन्शन योजनांचा समावेश असतो. अशाच प्रकारची एक नवीन योजना मोदी सरकारने आणली आहे. यामध्ये तुम्ही १००० रुपये गुंतवल्यास तुम्हाला २ लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला आयुष्यभर ५ हजार रुपये पेन्शन देखील मिळणार आहे.
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली नावाची हि योजना खास मोदी सरकारने आणली असून या योजनेत आता खासगी नोकरदार देखील पैसे गुंतवू शकतो.

जाणून घ्या NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) योजनेबद्दल

हि एक पेन्शन योजना असून २००४ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हि योजना सुरु करण्यात आली होती. मात्र २००९ नंतर हि योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली असून २०११ साली खासगी नोकरदारांसाठी देखील खुली केली होती.

अशा प्रकारे मिळवा या योजनेतून लाभ

जर या योजनेत तुम्ही १००० रुपये गुंतवत असला तर तुम्हाला २५ वर्षासाठी या योजनेत ८ टक्के व्याजदर मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही २५ वर्षात यामध्ये साडेनऊ लाख रुपये गुंतवल्यानंतर तुम्हाला ४० टक्के रक्कम एकसाथ काढू शकता. त्यानंतर उर्वरित रक्कम तुम्हाला पेन्शनच्या रूपात मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही जर चाळीस टक्के रक्कम म्हणजे १ लाख ९० हजार रुपये काढल्यास उर्वरित रकमेतून तुम्हाला महिना ५ हजार रुपये पेन्शनच्या रूपात मिळतील.

आरोग्यविषयक वृत्त –