खुशखबर ! शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ‘युरिया’ सब्सिडीची रक्कम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार युरियाच्या किंमतींवरील निर्बंध काढून घेण्याची योजना तयार करत आहे. एका वृत्तानुसार सरकार युरियाच्या किंमती ‘डी-कंट्रोल’ करु शकते. युरियावरील सरकारचे निर्बंध काढून टाकून सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘फर्टिलाइजर सब्सिडी सिस्टिम’ लागू करु शकते.

सरकारी निर्बंध हटवल्यानंतर युरियाच्या किंमती वाढून 400 ते 445 रुपये प्रति बॅग होऊ शकतात. सध्या युरियाची एक बॅग 242 रुपयांना उपलब्ध होते. सध्या सब्सिडीची रक्कम फर्टिलाइजर मॅन्युफॅक्चर्सला दिली जाते. मागील वर्षी सरकारने या सब्सिडीअंतर्गत 74 हजार कोटी रुपये निधी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर होणार युरिया सब्सिडीचे पैसे –
एका वृत्तानुसार सरकार एलपीजी सब्सिडीच्या धर्तीवर फर्टिलायजर सेक्टरमध्ये देखील सब्सिडी मॉडेल पुनर्जिवित करु इच्छित आहे. याद्वारे सरकार युरियावर मिळणारी सब्सिडी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करेल.

सध्या शेतकऱ्यांना बाजारात कमी दरात युरिया मिळते. कारण सरकार त्यावर सब्सिडी देते. आता सरकारकडून युरियावर मिळणारी सब्सिडी बंद करण्यात येईल. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे सरकारी सब्सिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि शेतकऱ्यांना बाजार दराने युरिया खरेदी करावी लागेल.

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्यांना मिळणार फायदा –
फर्टिलाइजर मंत्रालय डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) साठी पीएम किसान योजनेच्या आकडेवारीचा वापर करतील. पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना जमिनीसह बँकेची माहिती देखील सरकारला द्यावी लागेल. पीएम किसान बेनिफिशियर्सला युरिया सब्सिडी अ‍ॅडवान्समध्ये मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/