‘लॅपटॉप-कॅमेरा’, ‘वस्त्रोद्योग’ आणि ‘अ‍ॅल्युमिनियम’ उत्पादनांसह 20 प्रोडक्ट्स महाग होण्याची शक्यता, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकार लवकरच लॅपटॉप, कॅमेरा, वस्रोद्योग आणि अ‍ॅल्युमिनियम उत्पादनांसह 20 उत्पादनांवर कस्टम ड्युटी वाढवण्याचा विचार करत आहे. यासह काही स्टिल वस्तूंवर इम्पोर्ट लायसन्सिंग लादले जात आहे, जे चीनकडून आयातीवर बंदी आणण्याच्या उचललेल्या पावलांमुळे लादले जाणार आहेत.

कस्टम ड्युटी वाढवण्यासाठी प्रयत्नशील
सद्य स्थितीत कस्टम ड्युटी वाढवण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयासमोर आहे. ज्यांनी यापूर्वीच वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून आलेला हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, वेन्यू विभाग काही शुल्क जाहीर करण्याच्या तयारीत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही केवळ चीनवर लादली जाणारी ड्युटी नाही. तर कस्टम ड्युटी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीनकडून मोठ्या प्रमाणात वस्तू आयात केल्या जातात. त्या उत्पादनांवर लक्ष्य केंद्रीत करून आयात शुल्क वाढवण्यात येणार आहे.

मुक्त व्यापार करारानुसार अनेक वस्तू आयात
चीनकडून संबंध बिघडल्यानंतर अलीकडच्या काही आठवड्यात सरकारला असे दिसून आले आहे की, मुक्त व्यापार करारानुसार देशांकडून विशेषत: व्हिएतनाम आणि थायलंड सारख्या देशांकडून अनेक वस्तू आयात केल्या जात आहेत.

स्टील उत्पादने आयात करण्यासही निर्बंध
महसूल विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने वाणिज्य विभागाने टायर आणि टीव्हीसारख्या वस्तूंवर आयात परवाना लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच परवाना देणाऱ्या एजन्सी डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने काही स्टील उत्पादने आयात करण्यासही निर्बंध लादले आहेत. आयात बंदीशिवाय सरकारने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.