… तर मोदी सरकार देशातील सर्वात मोठी योजना ‘मनरेगा’ करणार बंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, मोदी सरकार मनरेगा या योजनेला कायम सुरु ठेवण्याचा विचारात नाही. ही योजना गरीबांच्या हितासाठी आहे, तर सरकारचे अंतिम लक्ष गरिबी संपवणे आहे. त्यामुळे गरिबी संपवल्यानंतर मनरेगा कायमसाठी बंद करण्यात येईल.

६०,००० कोटी रुपयांची तरतूद

त्यांनी सांगितले की २०१८ – २०१९ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी कायदा (मनरेगा) अंतर्गत ५५,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर या वर्षात ही वाढून ६०,००० कोटी रुपये करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की आम्ही मनरेगा योजनेत काही सुधारणा केल्या आहेत ज्याने ही योजना आधिक चांगली होईल. आता पर्यंत ९० टक्के मजदूरांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत.

त्यांनी असेही सांगितले की, मोदी कार्यकाळात MGNREGA, PMAY, PMGSY सारख्या विविध योजनांच्या बजेटमध्ये सरकारने मागील सरकारच्या तुलनेत ७६ टक्के वाढ केली आहे. २००९ – २०१४ मध्ये ३.५८ कोटी रुपये होते. आता २०१४ ते २०१९ मध्ये ५.७७ लाख कोटी रुपये करण्यात आले आहे.

यावेळी तोमर यांची ‘महिला स्वयंम सहाय्यता’ समूहाबद्दल बोलताना सांगितले की, हे गट ग्रामीण क्षेत्रात रोजगार निर्माण करत आहेत. सरकारने या समूहांना २ लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. आणि हे सर्व गट वेळेत आपले कर्ज परत करतात. याचे एनपीए फक्त २.७ टक्के आहे. मोठ्या कॉर्पोरेटला या सर्व समूहांकडून शिकवण घेण्याची गरज आहेत.

 

Loading...
You might also like