Modi Government | मोदी सरकारने 24 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये जमा केली ‘एवढी’ रक्कम; ‘इथं’ तपास

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मोदी सरकारने (Modi Government) गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये 24.07 कोटी लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. EPFO ने आतापर्यंत 24.07 कोटी लोकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, आतापर्यंत त्यांनी 24.07 कोटी लोकांच्या खात्यात 2020-21 या आर्थिक वर्षात 8.50 टक्के दराने PF व्याजाचे पैसे पाठवले आहेत. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, हे तुम्ही तपासले का? (Modi Government)

इतके आले व्याजाचे पैसे
विशेष म्हणजे 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.5 टक्के व्याज हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला सरकारने यापूर्वीच हिरवा झेंडा दाखवला होता. या निर्णयाला कामगार मंत्रालयानेही संमती दिली होती. आता EPFO ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे.

 

देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. अशा स्थितीत, सर्व खातेदार त्यांच्या खात्यात किती पीएफ व्याजाचे पैसे आले हे पाहण्यासाठी त्यांचे पीएफ खाते तपासत आहेत. (Modi Government)

अशा प्रकारे जाणून घ्या PF बॅलन्स

SMS द्वारे :
ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) पाठवा. LAN म्हणजे तुमची भाषा. इंग्रजीत माहिती हवी असल्यास LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM. हिंदीमध्ये माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून मेसेज करावा लागेल.

मिस कॉलद्वारे :
तुम्ही मिस्ड कॉलद्वारे तुमची ईपीएफ शिल्लक जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

वेबसाइट द्वारे :
तुमची शिल्लक ऑनलाइन तपासण्यासाठी, EPF पासबुक पोर्टलला भेट द्या. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून या पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये, Download/View Passbook वर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर पासबुक उघडेल ज्यामध्ये तुम्ही शिल्लक पाहू शकता.

उमंग अ‍ॅपद्वारे :
जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही जेव्हा हवे तेव्हा अ‍ॅपद्वारे तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता.
यासाठी UMANG APP ओपन करा आणि ईपीएफओवर क्लिक करा.
यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका.
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. तो प्रविष्ट केल्यानंतर, आपण EPF शिल्लक पाहू शकता.

Web Title : Modi Government | pm modi govt epfo send pf interest in more than
24 crore people bank account check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे