Modi Government | गरीबांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता 30 सप्टेंबरपर्यंत घेवू शकतात ‘या’ योजनेचा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक (Modi Cabinet Meeting) बोलावली होती. दुपारी साडेचार वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती. सहसा अशा बैठका बुधवारी होतात, मात्र शनिवारी ही बैठक कोणत्या उद्देशाने बोलावण्यात आली, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Modi Government)

 

बैठकीत घेण्यात आला हा निर्णय
या कॅबिनेट बैठकीत गरीब अन्न कल्याण योजनेला (Garib Anna Kalyan Yojana) पुढील 6 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहील, असा निर्णय मोदी कॅबिनेट (Modi cabinet) मध्ये घेण्यात आला. ही योजना 31 मार्चला बंद होणार होती.

 

कोरोनाच्या काळात सुरू केली योजना
कोरोना व्हायरस (Corona Virus) मुळे लॉकडाऊन लागू असताना केंद्र सरकारने ही योजना (PMGKAY) सुरू केली. त्यासाठी शासनाने 1 कोटी 70 लाखांची तरतूद केली होती. या अन्न योजनेंतर्गत गरिबांना प्रतिव्यक्ती 5 किलो दराने मोफत धान्य मिळत आहे. (Modi Government)

लखनौमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ
शुक्रवारी, जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ लखनौमध्ये होते कारण उत्तर प्रदेशमध्ये नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होणार होती. अशावेळी तेथून परतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी पीएम मोदींनी ही बैठक बोलावली.

 

संसदेच्या अधिवेशनात अशी चर्चा
विशेष म्हणजे सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे आणि अशा स्थितीत या मंत्रिमंडळ बैठकीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

 

Web Title :- Modi Government | pm narendra modi convenes important cabinet meeting will talk to ministers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | पुणे शहरात समान पाणी पुरवठा होत नसल्याबद्दल खा. गिरीश बापट यांचा कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग

 

Namrata Malla Dance Video | समुद्राच्या मध्यभागी नम्रता मल्लानं केला ‘दो घूंट’ या गाण्यावर डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

 

High BP | किडनीमध्ये समस्या असेल तरी सुद्धा होऊ शकते ‘हाय ब्लड प्रेशर’, जाणून घ्या ‘बीपी’ हाय होण्याची 5 कारणे