home page top 1

‘खुशखबर’ ! आता पेट्रोलने नव्हे ऊसाच्या रसाने चालणार वाहने, अशी होणार पैशाची ‘सेव्हिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोलपेक्षा स्वस्त असलेले इथेनॉल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सरकारने देखील इथेनॉलचे फायदे आणि उपयुक्तता मान्य केली असून याच्या उत्पादनावर जोर दिला आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी नुकतीच एक इथेनॉलवर चालणाऱ्या गाडीचे उदघाटन केले होते. त्यामुळे आता सरकार देखील इथेनॉलचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे.

हे आहेत इथेनॉलचे फायदे

इथेनॉल हे ५० ते ५५ रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. पेट्रोलच्या तुलनेत कमी ऍव्हरेज देणार असले तरी किंमत कमी असल्याने शेतकऱ्यांना हे फायदेशीर ठरणार आहे. इथेनॉल हे उसापासून बनवले जात असल्याने भारतात कुठेही याचे उत्पादन शक्य आहे. त्याबरोबरच भारताला इथेनॉलसाठी अन्य देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे उसाबरोबरच इथेनॉल निर्मिती झाल्याने शेतकऱ्यांना उसाला देखील चांगला दर मिळू शकतो. इथेनॉलच्या वापराने भारतीयांचे पैसे देखील वाचणार आहेत आणि आखाती देशातून मागवाव्या लागणाऱ्या तेलामुळे आपले पैसे देखील वाचणार आहेत. त्याचबरोबर इथेनॉलच्या वापरामुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होणार नाही.

दरम्यान, इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांना देखील याचा फायदा होणार असून इथेनॉल मध्ये अल्कोहल लवकर उडून जाते यामुळे इंजिन लवकर गरम होत नाही. त्यामुळे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या उत्तम स्थितीत राहणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like