भारताची ‘ताकद’ वाढणार, नौदलात सहभागी होणार ६ ‘सबमरिन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नौदलासाठी आता आनंदाची बाब आहे ती म्हणजे भारत सरकारने ६ नव्या सबमरिन भारतात निर्माण करण्याच्या प्रोजेक्टला प्रोस्ताहन देण्यासाठी प्रोजेक्टसाठी भारतीय निर्माता ठरवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रोजेक्ट मध्ये अनेक विदेशी कंपन्या भारतीय शिपयार्डबरोबर ६ डिजेल इलेक्ट्रिक सबमरिन बनवणार आहे. ज्यासाठी ४५००० कोटी खर्च येणार आहे. मेक इन इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत दुसरा मोठा संरक्षण करार असणार आहे.

PROJECT 75 (I) अंतर्गत बनवण्यात येणारी डिजेल – इलेक्ट्रिक असतील, यात AIR INDEPENDENT PROPULSION (AIP) बरोबरच अनेक आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञान असेल. AIP असलेली अनेक डिजेल-इलेक्ट्रिक सबमरीन बऱ्याच काळासाठी पाण्याखाली राहू शकतात.

या सबमरिनची निर्मिती STRATEGIC PARTNERSHIP मॉडेल नुसार होईल. म्हणजेच अनेक विदेशी कंपन्या आपल्या भारतीय पार्टनर बरोबर भारतातच या सबमरिन निर्माण करण्यासाठी आवश्यक इन्फ्रास्टक्चर बनवेल. तेथेच सबमरिन बनवण्यात येईल. यामुळे भारतात फक्त तंत्रज्ञान येणार नाही तर भारतातील प्रशिक्षित कामगारांची आणि इंजिनिअर्सची ताकद देखील वाढेल. भारतात बनवण्यात येणाऱ्या सबमरिन या फ्रान्सच्या मदतीने बनवलेल्या कलवरी सारख्या बनवण्याचा प्रयत्न असेल.

भारताने १९९७ मध्ये २४ नव्या सबमरिन बनवण्याची योजना तयार केली होती. ज्याला PROJECT 75 नाव देण्यात आले होते. नंतर त्याचे दोन भाग पाडण्यात आले, दुसऱ्या प्रोजेक्टचे नाव PROJECT 75 (I). यात परंपरागत आणि न्युक्लिअर असे दोन्ही सबमरिनचा समावेश आहे. PROJECT 75 अंतर्गतच फ्रान्सच्या तंत्रज्ञानावर आधारित माझगाव डॉक लिमिटेड मध्ये कलवरी क्लासच्या ६ सबमरिनचे काम चालू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो