Modi Government | रेशन दुकानात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government Take Big Decision For Ration Beneficiaries | राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) मोदी सरकारतर्फे (Modi Government) देशातील 80 कोटी लोकांना अनुक्रमे दोन रुपये दराने प्रति व्यक्ती 5 किलो गहू आणि तांदूळ देण्यात येत आहेत. दरम्यान, रेशन दुकानातून (Ration Shop) अनेक शिधावाटप दुकानदार रेशनचे धान्य कमी देऊन कार्डधारकांची (Ration Card Holder) फसवणूक (Fraud) करत असल्याची बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली आहे. यासाठी केंद्र सरकारने (Modi Government) कार्डधारकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

 

सरकारच्या नव्या नियमानुसार, रेशन दुकानात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी आता रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (EPOS) उपकरण बसविणे बंधनकारक करण्यात आलेय. त्याचबरोबर, कार्डधारकांना योग्य प्रमाणात धान्य मिळावे यासाठी EPOS उपकरण इलेक्ट्रॉनिक स्केलसह जोडणे बंधनकारक केले आहे. कार्डधारकांना योग्य प्रमाणात धान्य मिळावे, त्यांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी सरकारने नवा नियम केला आहे. (Modi Government)

 

प्रत्येक राज्यासाठी हेल्पलाईन..
रेशनकार्ड धारकाला कमी धान्य मिळत असेल तर याबाबत त्याला आता तक्रार देखील करता येणार आहे.
यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी एक हेल्पलाईन नंबर (Helpline Number) जारी करण्यात आला आहे.
यावर कमी धान्य देणाऱ्या शिधावाटप दुकानदाराची तक्रार करता येणार आहे. टोल फ्री नंबर https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकवर क्लिक करून आपण तक्रार करु शकतात. अनेक महिने आपणास रेशनकार्ड मिळाले नसेल तर याबबाबतही इथे तक्रार करण्याची मुभा देण्यात आली आहे.

महाराष्ट्रासाठी टोल फ्री क्रमांक –

टोल फ्री हेल्पलाईन नंबर – 1800-22-4950

 

Web Title :- Modi Government | ration shopkeepers beware if you cheat while counting the grain you will have to pay the penalty modi government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा