दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला कंपनीने घेतला दत्तक !

नवी दिल्ली :

देशाच्या राजधानीतील लाल किल्ला दत्तक घेण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. दिल्लीतील एका प्रमुख कॉर्पोरेट हाऊस दालमिया ग्रुपकडून लाल किल्ला दत्तक घेण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे. केंद्र सरकारच्या अडॉप्ट द हेरिटेज या योजनेतंर्गत तब्बल 25 कोटींमध्ये डालमिया ग्रुपनं लाल किल्ला दत्तक घेतल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

केंद्र सरकारच्या अडॉप्ट द हेरिटेज या योजनेअंतर्गत तब्बल 25 कोटींमध्ये डालमिया ग्रुपनं युनेस्को जागतिक वारसा असलेले हे स्थळ संवर्धनासाठी दत्तक घेतले आहे. 23 मे पासून डालमिया ग्रुप या किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचीही माहिती आहे. डालमिया भारत ग्रुप,पर्यटन मंत्रालय आणि आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या यांच्यामधे लालकिल्ल्याच्या संवर्धनासाठीचं कंत्राट 9 एप्रिल रोजी ठरले आणि कंत्राटाप्रमाणे 6 महिन्याच्या कालावधीत डालमिया ग्रुप लालकिलल्याचं संवर्धन आणि किल्ल्यामधे आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचे काम करणार आहे.