Modi government | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा ! दैनंदिन जीवनात लागणार्‍या ‘या’ गोष्टीचे दर होणार कमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Modi government | गेल्या दीड वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे (Corona and Lockdown) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलं असताना दुसरीकडे महागाईमुळे ( Inflation) अनेकांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत देशवासीयांना किंचित दिलासा मिळणार आहे. खाद्य तेलाचे दर (edible oil rate) आता कमी होणार आहेत. मोदी सरकारने (Modi government) कच्च्या पाम तेलावरील आयात कर 10 टक्के केल्याने तेल स्वस्त होणार आहे.

अन्य पाम तेलावरीत आयात शुल्क 37.5 % असेल. आज बुधवारपासून (दि. 30) या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून तो 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. मोदी सरकारकडून (Modi government) आता सर्वसामान्यांना आणखी काही सुविधा मिळतील अशी देखील अपेक्षा सर्वसामान्य करीत आहेत.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर अन् सीमा शुल्क बोर्डाने (Central Board of Indirect Taxes and Customs) मंगळवारी (दि. 29) रात्री एक अधिसूचना काढली आहे. कच्च्या पाम तेलावरील बेसिक कस्टम ड्युटी (Basic custom duty on crude palm oil) 10 टक्के केल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. कच्च्या पाम तेलावर 10 टक्के बेसिक कस्टम ड्युटीसोबत (Basic custom duty) आयात शुल्क 30.25 टक्के इतक असेल.

यावर उपकर आणि अन्य शुल्क आकारण्यात येईल. रिफाईंड पाम तेलावरील शुल्क (Charges on refined palm oil) आजपासून 41.25 टक्के केले आहे. पाम तेलावर सध्या बेसिक सीमा शुल्क (Basic customs) 15 टक्के आहे. आरबीडी (रिफाईंड, ब्लिच्ड, डिओडोराईझ्ड) पाम तेल (Palm oil), आरबीडी पामोलीन (RBD palmolin), आरबीडी पाम स्टीयरिन (RBD palm styrene) आणि अन्य श्रेणींवर 45 टक्के शुल्क आकारले जाते. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने कच्च्या पाम तेलावरील शुल्क 35.75 टक्क्यांवरून 30.25 टक्के आणि रिफाईंड पाम
तेलावरील शुल्क (Charges on refined palm oil) 49.5 टक्क्यांवरून 41.25 टक्के केलं
आहे. यामुळे बाजारात तेलाचे दर कमी होणार असल्याचे सीबीआयसीने ट्विटमध्ये म्हटल आहे.

हे देखील वाचा

Gang Rape | हुंडा न मिळाल्याने लग्नाच्या दोन दिवसानंतर नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार; गुप्तांगालाही दिले चटके

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट ! आज सोनं 300 तर चांदी 700 रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे मुंबई अन् पुण्यातील दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Modi government reduced import duty crude palm oil it will help reducing price edible oils

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update