मोदी सरकारची स्कीम ! ‘शॉपिंग’ करा, बिल घ्या आणि मिळवा 10 लाखापासून 1 कोटी रूपयांपर्यंत ‘बक्षीस’, जाणून घ्या कसं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांना सामान खरेदीवर बिल घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकार एक लॉटरी योजना आणणार आहे. वस्तू किंवा सेवा कर लॉटरी योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत बक्षिस देण्यात येणार आहे. ग्राहक, खरेदीदार जे बिल घेतील, त्याद्वारे ते लॉटरी जिंकू शकतात.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डचे सदस्य जॉन जोसफ यांनी सांगितले की माल आणि सेवा कराच्या प्रत्येक बिलावर ग्राहकांना लॉटरी जिंकल्याची संधी मिळेल. यामुळे ग्राहक कर देण्यास प्रोत्साहन मिळेल. जोसफ यांनी उद्योग मंडळ एसोचॅममध्ये एका कार्यक्रमात संबोधित करताना सांगितले की आम्ही एक नवी लॉटरी प्रणाली घेऊन येत आहोत.

जीएसटीअंतर्गत प्रत्येक बिलावर लॉटरी जिंकता येईल. याचे ड्रॉ काढण्यात येतील. लॉटरीचे मूल्य इतके अत्याधिक असणार आहे की ग्राहकच म्हणतील 28 टक्के न वाचवता 10 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी घ्यावी.

योजनेतंर्गत ग्राहकांच्या बिलांना पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. लॉटरी ड्रा प्रणाली द्वारे काढण्यात येईल. विजेत्याला ही माहिती देण्यात येईल. जीएसटी प्रणाली अंतर्गत चार टॅक्स स्लॅब 5,12,28 असे असेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या नेतृत्वात जीएसटी परिषद प्रस्तावित लॉटरी योजनेची समीक्षा करतील. परिषदेत हा देखील निर्णय होईल की बिलाच्या मूल्याची अंतिम मर्यादा काय असेल. लॉटरी विजेत्याला ग्राहक कल्याण कोषातून पुरस्कार देण्यात येईल. या कोषात करचुकवेगिरी कारवाईत जमा झालेली रक्कम ठेवण्यात येत असते.

जीएसटी महसूलात कमी आल्याने ती दूर करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या उपभोक्ता सौद्यावर विविध पर्यांयावर विचार करत आहे. यात लॉटरी आणि क्यूआर संहिता आधारित व्यवहाराला प्रोस्ताहन देण्याचा समावेश आहे.