मोदी सरकारच्या ‘या’ स्कीमव्दारे तुम्ही करू शकता Corona चा एकदम फ्री उपचार, ‘या’ पध्दतीनं तपासा लिस्टमधील तुमचं नाव, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे उपचार देखील खूप महाग आहेत. सरकारी रुग्णालयांचे बेड आधीच भरले आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संसर्ग झालेल्यांना खाजगी रुग्णालयांत जाण्याशिवाय पर्याय नाही. खासगी रुग्णालयात उपचार करणे खूप महाग आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सरकारकडे पाहिले तर तुम्हाला केंद्र सरकारने सुरू केलेली आयुष्मान भारत योजना नक्कीच माहित असेल.वर्षभरात एकदा ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी एकदा ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार दिले जातात. यासाठी लाभार्थ्यांना ई-कार्ड दिले जाते. या कार्डद्वारे सहजपणे कॅशलेस सेवेचा लाभ घेऊ शकता. पण तुम्हाला या योजनेचा लाभ तेव्हाच मिळेल, जेव्हा तुमचे नाव या योजनेत समाविष्ट असेल.जाणून घ्या कसे तपासायचे आपले नाव
- आयुष्मान भारत योजनेतील आपले नाव तपासण्यासाठी प्रथम तुम्हाला https://www.pmjay.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. साइटवर तुम्हाला Am I Eligible ची एक लिंक दिसेल, ज्यावर क्लिक करावे लागेल. लिंकवर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल. ज्यामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती नोंदवली पाहिजे. संपूर्ण माहिती दिल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक ओटीपी येईल. जो भरून सबमिट करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.
- त्यानंतर काही श्रेणी दिसतील. तुम्हाला ज्या श्रेणीत आपले नाव तपासायचे आहे, त्या श्रेणीवर क्लिक करा. यात तुमचे नाव, एचएचडी नंबर, रेशन कार्ड आणि मोबाइल नंबरसाठी पर्याय असतील. ज्यात क्लिक करून तुमचे नाव आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट आहे की नाही हे शोधू शकता.
- तुम्हाला ऑनलाईन तपासणी करायची नसल्यास कॉल करूनही तुम्ही शोधू शकता. यासाठी तुम्ही १४५५५ आणि १८००-१११-५६५ वर कॉल करून शोधू शकता.