Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दिवसाला 50 रुपयांची करा बचत, मॅच्युरिटीवर मिळतील 35 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government Schemes | भारतीय पोस्ट ऑफिसची (Indian Post Office) ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) गुंतवणुकीसाठी (Investment) चांगला पर्याय आहे. मोदी सरकारच्या या योजनेत (Modi Government Schemes) तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत, नामनिर्देशित व्यक्तीला 80 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यास, त्याच्या कायदेशीर वारसाला बोनससह विमा रक्कम दिली जाते.

 

ही विमा योजना 19 ते 55 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो. या योजनेंतर्गत किमान विम्याची रक्कम 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवता येते. या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट (Premium Payment) मासिक, त्रैमासिक, सामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकतात. याशिवाय प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. पॉलिसी मुदतीदरम्यान डिफॉल्ट (Default) झाल्यास, ग्राहक प्रलंबित प्रीमियम भरुन पॉलिसीचे पुनरुज्जीवन करु शकतो.

 

योजनेची कर्ज सुविधा
या विमा योजनेत कर्ज सुविधा (Loan Facility) ही देण्यात आली आहे. जी पॉलिसी खरेदी केल्यानंतर चार वर्षांनी मिळू शकते. ग्राहकाला तीन वर्षानंतर पॉलिसी सरेंडर (Policy Surrender) करता येते. परंतु, त्यावेळी तुम्हाला याचा कोणताही फायदा मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस आणि शेवटचा जाहीर केलेला बोनस प्रति वर्ष 1 हजार रुपये 65 असे आश्वासन दिले होते. (Modi Government Schemes)

योजनेचे फायदे
जर एखाद्याने वयाच्या 19 वर्षांत 10 लाखांची ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतली,
तर मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल.
पॉलिसी खरेदी करणाऱ्यास 55 वर्षासाठी 31.60 लाख, 58 वर्षासाठी 33.40 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळतो.
60 वर्षासाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये असेल.

 

या ठिकाणी मिळेल योजनेची माहिती
नामनिर्देशित व्यक्तीचे नाव किंवा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर यासारख्या इतर तपशीलांमध्ये कोणतेही अपडेट असल्यास,
ग्राहक त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतो.
इतर प्रश्नांसाठी, ग्राहक दिलेल्या टोल-फ्री हेल्पलाइन 1800 180 5232/155232 वर किंवा www.postallifeinsurance.gov.in
या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर माहितीसाठी संपर्क साधू शकतात.

 

Web Title :- Modi Government Schemes | modi government new scheme save rs 50 per day you will get rs 35 lakh on maturity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दुर्दैवी ! कॉलेजमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला वाहनाची धडक, दोघांचा मृत्यू

 

Nutan Marathi Vidyalaya (NMV Pune) | शिवजयंती निमीत्त नू. म. वी शाळेतील 200 विद्यार्थ्यांना भगवा फेटा घालून आनंद साजरा

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 700 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी