फायद्याची गोष्ट ! सरकार देतंय बाजार भावापेक्षा स्वस्तामध्ये सोने खरेदीची ‘सवुर्ण’संधी, घ्या ‘या’ स्कीमचा ‘लाभ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारच्या सॉव्हरेन गोल्ड बॉण्डचा पुढचा टप्पा ६ जुलै २०२० पासून पुन्हा सुरू होणार आहे. जर आपली पहिल्या टप्प्यात गुंतवणूक करायची राहिली असेल, तर आपण पुढच्या टप्प्यात गुंतवणूक करू शकता.

सरकारी गोल्ड बॉण्ड योजना २०२०-२१ मालिका-४ चे सब्स्क्रिप्शन ६ जुलै २०२० पासून सुरू होईल आणि १० जुलै रोजी बंद होईल. केंद्रीय बँकेने एप्रिलमध्ये जाहीर केले होते की, सरकार एप्रिल २०२० ते सप्टेंबर या कालावधीत सहा हप्त्यांमध्ये सरकारी गोल्ड बॉण्ड जारी करेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) भारत सरकारच्या वतीने हा बॉण्ड जारी करेल. सरकारी गोल्ड बॉण्डसाठी इश्यू प्राइसही प्रति ग्रॅम ४,८५२ रुपये निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ८ ते १२ जून दरम्यान सब्स्क्रिप्शनसाठी उघडलेल्या बॉण्डची इश्यू प्राइस प्रति ग्रॅम ४,६७७ रुपये होती.

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, इश्यू प्राइस सब्स्क्रिप्शनमुळे आधीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन दिवसांसाठी आयबीजेएकडून जारी केलेल्या ९९९ शुद्ध सोन्याच्या बंद किंमतीच्या साधारण सरासरीपासून रुपयात निश्चित केली जाईल.

ऑनलाईन अर्ज करून डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकारने आरबीआयशी सल्लामसलत करून ५० रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचे ठरवले. अशा गुंतवणूकदारांसाठी इश्यू प्राइस प्रति ग्रॅम ४,८०२ रुपये असेल.

या वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत स्थिर राहील अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत सोन्याची किंमत वर्षाच्या अखेरीस ५३ हजारपर्यंत जाऊ शकते. यामुळे सॉव्हरेन गोल्ड बॉण्डला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो.