धक्कादायक ! मोदी सरकारने जाहिरातीसाठी केले एवढे हजार कोटी रुपये खर्च  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या विकासाच्या योजनेसाठी निधीची हजार कोटीत झालेला खर्च आपण ऐकला असेल परंतु तुम्ही योजनेच्या प्रचारासाठी हजारो कोटींच्या रकमेचा चुराडा केल्याचे ऐकले नसेल परंतु आज या संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज माहिती आणि प्रसारण  मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी २०१४ साली भाजप सत्तेत आल्या पासून ते ८ डिसेंबर २०१८ पर्यंत भाजप सरकारने जाहिरातीवर ५,२४५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे आसा खुलासा राजवर्धन सिंह राठोड यांनी आज लोकसभेत दिला आहे.

भाजप सरकार जाहिरातीवर वारेमाप खर्च करत असल्याचे विरोधी पक्षांकडून नेहमीच सांगण्यात येते आहे. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन कि बात’ कार्यक्रमावर हि असाच खर्च सरकार करते त्याचा हि विरोधी पक्षाकडून वेळोवेळी खरपूस समाचार घेतला गेला आहे. सरकार जाहिरातीवर किती खर्च करते या संदर्भात आज लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना राजवर्धन सिंह राठोड यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. राजवर्धन सिंह राठोड उत्तरादाखल म्हणाले कि सरकारने आखलेल्या योजना लोकांपर्यत पोहचवण्यासाठी विविध प्रसार माध्यमात जाहिराती द्याव्या लागतात त्यामुळे त्या साठी सरकारच्या वतीने खर्च हा होतोच त्याच प्रमाणे लोकांना योजनेची माहिती स्पष्ट शब्दात आणि अचूक समजण्यासाठी हि या जाहिरातीचा उपयोग होतो. तसेच जाहिराती दिल्यावरच योजना लोकांपर्यत पोहचते आणि लोक सरकारच्या योजने प्रति जागृक बनत जातात.

सरकारचा योजनांवरील खर्च आणि त्या योजनांवरील प्रसिद्धीचा खर्च दोन्ही जर समान असेल तर सरकारवर टीका होणे साहजिक गोष्ट आहे. असे राजकीय वर्तुळात बोलले जात असून मोदी सरकारच्या जाहिरातींवरील उधळ पट्टीवर सध्या दबक्या आवाज बोलले जाते आहे. केंद्र सरकारचा  ब्युरो ऑफ आऊटरिच एंड कम्युनिकेशन हा विभाग केंद्र सरकारच्या खर्चाचे तपशील ठेवण्याचे काम करतो. त्या खात्याकडून मागच्या काही काळात एका माहितीच्या अधिकार कार्यर्त्याने या संदर्भात केंद्र सरकारचा जाहिरातींवरील खर्च मागितला होता तेव्हा त्या कार्यकर्त्याला दिलेल्या माहितीतील आकडा हा ४३४३ हजार कोटी एवढा होता.  हा माहितीचा अधिकार मे २०१८ रोजी टाकण्यात आला होता. म्हणजे सात महिन्यात या आकड्यात वाढ होऊन तो आकडा  ५,२४५ एवढा झाला आहे.