‘FD’ नियमात ‘बदल’ करण्याच्या तयारीत सरकार, होणार ‘हे’ फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येणाऱ्या काळात डीमॅट फॉर्मेटमध्ये FD जारी होण्याची शक्यता आहे. कारण वित्तीय क्षेत्रात प्रौद्योगिकीच्या वापरात गठीत एका मंत्रालयच्या समितीने फिक्स डिपॉजिट आणि इतर फायनॅन्शिअल प्राॅडक्ट डीमॅट स्वरुपात जारी करण्याच्या कायद्यात बदल करण्याची शिफारस केली आहे. समितीने सांगितले की FD आणि इतर प्रोडक्टला डिमॅट स्वरुपात जारी करणे ग्राहकांना अनुकूल असण्याबरोबरच सुरक्षित आहे.

आर्थिक प्रकरणाच्या सचिवांच्या समितीने शिफारस केली की, डिपार्डमेंट ऑफ फायनॅंशिअल सर्विसेज आणि RBI ला वर्चुअल बँकिंग सिस्टिमच्या अनुकूल असल्याची देखील तपासणी केली पाहिजे.

कायद्यात होणार बदल –
समितीने आपला अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना दिला आहे. समितीने शिफारस केली की FD आणि इतर वित्तीय उत्पादनांना डिमॅट स्वरुपात जारी करणे योग्य ठरेल.

पोस्ट ऑफिसमध्ये देखील जमा असेट्स डीमॅट बदलण्यात येईल –
सरकार पोस्ट ऑफिस आणि इतर संस्थांकडे असलेली वित्तीय संपत्ती डीमॅटच्या स्वरुपात बदण्यासाठी अभियान राबवण्यात येणार आहे. जेवढे शक्य होईल तेवडे डिमॅटमध्ये बदलण्यात येईल. अन्यथा त्याला इलेक्ट्रॉनिक स्वरुपात बदलण्यात येईल.

हा फायदा होणार –
डीमॅट फॉर्म सर्वात सुरक्षित खाते मानले जाते. यासाठी KYC करणे आवश्यक असते, KYC ने आपले फायनॅंशिअल प्राॅडक्ट अधिक सुरक्षित होतात. यात फसवेगिरीवर रोख लावता येते.

आरोग्यविषयक वृत्त –