विकासाच्या ‘पदपथा’वर जम्मू-काश्मीर ! मोदी सरकार 2.0 ने 30 दिवसात घेतले ‘हे’ 50 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कलम 370 मोदी सरकारने रद्द केल्यानंतर त्यासंबंधित अनेक महत्वाचे निर्णय घेतले. ज्यामुळे जम्मू काश्मीर विकासाच्या पथावर मार्गक्रमण करेल. सरकारने जम्मू काश्मीरला केंद्र शासित प्रदेश बनवण्याची घोषणा केली आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर 30 दिवसात मोदी सरकारने राज्यात काही बदल करण्यासाठी 50 मोठे निर्णय घेतले.

1. केंद्र सरकारने ग्राम पंचायतच्या विकासासाठी 4483 पंचायतींना 366 कोटी रुपये निधी दिला गेला.
2. सरपंचांना दरमहा 2500 रुपये तर पंचांना 1000 रुपये रक्कम प्रोस्ताहनपर रक्कम देण्यात आली.
3. ग्रामपंचायतींच्या वही खात्याची देखरेख करण्यासाठी 2000 अकाऊंटंटची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली.
4. सरकारने 634 ग्राम पंचायतींना इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याचा निर्णय घेतला.
5. प्रत्येक जिल्ह्यात 2 डिजिटल गावांची निर्मिती करण्यात येणार.
6. आधारच्या माध्यमातून सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचवणार.
7. सरकारी योजना आधारला लिंक करण्यात येणार.
8. 80 हजार कोटीच्या पंतप्रधान विकास निधीला वेग देणार.
9. विकासाच्या योजनांसाठी 8 हजार कोटी रुपये देणार.
10. जम्मू रिंग रोडचा पहिला टप्पा 1 डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करणार.
11. जम्मू काश्मीरमध्ये 1632 किमीचे रस्ते निर्माण करणार.
12. कठुआ आणि हंदवाडामध्ये इंडस्ट्रिअल बायो टेक्नोलॉजी पॉर्कचे काम सुरु
13. 15 लाख घरात पाइपच्या माध्यमातून 24 तास पाणी पुरवठा करण्याचे काम सुरु.
14. बारामुलापासून कुपवाडा दरम्यान रेल्वे लिंक करण्याचा सर्वेला मंजूरी.
15. जम्मू काश्मीरमध्ये 5 – 5 लाख स्क्वेअर फुटाचे आयटी पार्क सुरु करणार.
16. 2500 मेगावाट वीजेचे उत्पादन करणार.
17. गुलमर्ग, पहलगाम, पटनीटॉप आणि सोनमर्गमध्ये जमिनीतून वीजेच्या तारा टाकण्याचे काम सुरु.
18. श्रीनगरसह अनेक शहरात पाइपच्या माध्यमातून घरगुती गॅस पोहचण्यासाठी काम सुरु.
19. अवंतीपूरा आणि विजयपूरमध्ये एम्सचे निर्माण कार्य सुरु, फेब्रुवारी 2019 मध्ये कामाला सुरुवात झाली होती.
20. जम्मू काश्मीरमध्ये एमबीबीएसच्या 400 जागा वाढवणार, आता राज्यात याची संस्खा 900 होईल.
21. श्रीनगरमध्ये 120 कोटी रुपयांचे स्टेट कॅंसर इंस्टिट्यूट बनवणार.
22. 50 हजार घरांसह सॅटेलाइट टाऊन विकासित करणार.
23. श्रीनगरमध्ये मेट्रो रेल्वेची निर्मिती करणार.
24. ग्रेटर श्रीनगरमध्ये मास्टर प्लॅन 2035 तयार.
25. काश्मीरमध्ये पीएम शहरी आवास योजनेअंतर्गत 15,334 घरे मंजूर
26. 40 हजार नव्या लोकांना ओल्ड एज पेंशन, विधवा पेंशन स्कीमचा समावेश आहे.
27. 66 नव्या गावात बँकवर्ड एरियामध्ये सहभागी करणार.
28. पोलीसकर्मचाऱ्यांना 20 हजार नवे घर देण्यास मंजूरी
29. पीएम पीक विमा योजनेअंतर्गत 85 हजार शेतकऱ्यांची नोंदणी.
30. मेधावी दिव्यांग विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य.
31. शरणार्थिंना 5: 50 लाखांची आर्थिक मदत.
32. पंतप्रधान श्रम योगी मान धन योजनेअंतर्गत 55,544 मजूरांची नोंदणी
33. जम्मू काश्मीरच्या प्रत्येक जिल्हयात जुवेनाइल जस्टिस बोर्ड आणि चाइल्ड वेलफेअर समितीचे गठण.
34. सर्व शिक्षा अभियांनातर्गंत 43 हजार शिक्षकांना स्थायी करण्याची प्रक्रिया सुरु.
35. आंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन म्हणून 3600 रुपयांवरुन 4100 रुपये करण्यात आले.
36. राज्यातील युवकांना 50 हजार नव्या नोकऱ्या देणार
37. नोव्हेंबर 2019 मध्ये श्रीनगरमध्ये मेगा इंवेस्टर समिटचा आयोजन.
38. इंन्वेस्टर आंत्रप्रेन्योरसाठी सिंगल विडोची व्यवस्था
39. डल तलावाची सुंदरता वाढवण्यावर जोर देणार
40. त्राल आणि किशनगंगामघ्ये 2 वाइल्ड लाइफ सेंच्युरीचा प्रस्ताव
41. प्लास्टिक बॅग
42. पर्यटनाला प्रोस्ताहन देण्यासाठी गुलमर्ग मास्टर प्लॅन 2032 च्या फेज 1 ला मंजूरी, फेज 2 चा प्लॅन या वर्षीपर्यंत पूर्ण होणार
43. लेह आणि कारगिलमध्ये नवे पर्यटन स्थल विकासित करण्यात येईल.
44. इको पर्यटनाला प्रोस्ताहन देण्यासाठी 250 कोटी रुपयांच्या फंड देणार
45. क्रिडा इंफ्रास्टक्चरसाठी 250 कोटीचा निधी देणार
46. प्रत्येक पंचायतमध्ये खेळासाठी मैदान तयार करणार
47. राज्यात फुटबॉल टूर्नामेंटचे आयोजन करणार
48. श्रीनगर आणि जम्मूमध्ये सार्वजनिक व्यायाम शाळा तयार करणार
49. राज्यात 1 हजार मेडिकल ऑफिसरची भरती करणार.
50. वर्ग 4 च्या सर्व नोकरीमध्ये मुलाखतची व्यवस्था संपवण्यात येणार.

आरोग्यविषयक वृत्त –