Modi Government | मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ! सर्व सरकारी योजनांमध्ये पौष्टिक तांदूळ वाटपाला मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व सरकारी योजनांमध्ये पौष्टिक तांदूळ (Fortified Rice) वितरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक (Union Cabinet Meeting) पार पडली आहे. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

केंद्राच्या निर्णयानंतर आता सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) आणि इतर योजनांतर्गत पौष्टिक तांदूळाचे वितरण तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याबाबत पुरवठा आणि वितरणासाठी, भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation of India) आणि राज्य संस्थांनी आधीच 88.65 लाख टन अतिरिक्त पौष्टिक तांदूळ खरेदी केले आहेत,” अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी दिली आहे. (Modi Government)

 

 

पुढे अनुराग ठाकूर म्हणाले की, ”लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाईल. तसेच, 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. तसेच, या योजनेवर दरवर्षी 2,700 कोटी रुपये खर्च केले जातील, ज्याचा भार केंद्र सरकार उचलेल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत उपलब्ध असलेला तांदूळ पौष्टिक बनवूनच विकला जाईल,” असंही त्यांनी सांगितलं.

 

Web Title :- Modi Government | union cabinet approves distribution of fortified rice across government schemes says union minister anurag thakur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा