Modi Government | मोदी सरकार आणणार जेष्ठ नागरिकांसाठी ‘बेस्ट पेन्शन योजना’; मिळणार निश्चित परतावा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) अनेक पेन्शन योजना आणल्या आहेत. त्यातच मोदी सरकार (Modi government) आता आणखी एक नवी पेन्शन योजना आणणार आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ही योजना आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या योजनेमुळे आता निवृत्तीनंतर पेन्शनची चिंता लवकरच संपणार आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यांचे नियमित उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे त्यांचे पेन्शन. अशा परिस्थितीत सरकार चालवत असलेली वय वंदना योजना (Vay Vandana Yojana) ही त्यांच्यासाठी एक आकर्षक पर्याय आहे.

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) या नवीन पेन्शन योजनेद्वारे वयवर्ष 60 वयानंतर एक निश्चित पेन्शन मिळेल. तसेच निश्चित परताव्याची हमी दिली जाईल. प्रत्येकजण नवीन पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. तर, ही योजना आगामी 6 ते 8 महिन्यात सुरु केली जाऊ शकते. त्याचबरोबर यामध्ये निश्चित परतावा म्हणजेच रिफंड मिळणार आहे. पीएफआरडीए नवीन योजनेसाठी प्रयत्न करत आहे आणि अनेक कंपन्यांशी चर्चा देखील सुरु आहे.

या लाॅन्च होणा-या योजनेत अनेकजण गुंतवणुक करु शकणार आहे. खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य माणूसही यात गुंतवणूक करू शकणार आहे. दरम्यान, मोदी सरकारने सुरु केलेली अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS योजना स्वतंत्र होणार आहे. तसेच या नवीन योजनेत लॉक इन पीरियडची तरतुद असणार आहे. यामुळे ग्राहकाला एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणुक करावी लागणार आहे.

 

पैसे गुंतवा आणि प्रत्येकवर्षी मिळवा 1.1 लाख रुपये –

वय वंदना योजने (Vay Vandana Yojana) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला 1,11,000 रुपये मिळणार आहे.
या योजनेचा कालावधी आणखी वाढवला आहे. या योजनेची मुदत 31 मार्च 2020 होती. ती वाढवून 2023 पर्यंत करण्यात आली आहे.
बाकी योजनेच्या तुलनेमध्ये पंतप्रधान वय वंदना योजनेत अधिक व्याज मिळत आहे. कोरोनाच्या संकटामुळे या योजनेच्या व्याजदरात कपात केली आहे.
यामध्ये व्याजदर 8 टक्क्यांवरून घसरुन 7.4 टक्क्यांवर आला आहे.
तसेच, वार्षिक निवृत्ती वेतनाची पर्याय निवड केल्यास 7.66 टक्के वार्षिक परतावा मिळणार आहे. (Modi Government)

Web Title :- modi government | Vay Vandana Yojana atal pension yojana nps pfrdca to launch new guaranteed pension scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

HR Manager Suicide | खळबळजनक ! प्रसिद्ध कंपनीतील 30 वर्षाच्या HR मॅनेजरची आत्महत्या, सुसाईड नोट मिळाली

MP Supriya Sule | शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही – खा. सुप्रिया सुळे (व्हिडीओ)

Dhule Zilla Parishad Election | धुळ्यात महाविकास आघाडीला दणका ! चंद्रकांत पाटलांच्या मुलीची ‘बाजी’